Join us  

टीम इंडियात कितीही प्रयोग करा; ट्वेंटी-20 वर्ल्ड कप खेळणारे पंधरा खेळाडू ठरलेत!

वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतील अपयशानंतर भारतीय संघ लगेचच 2020च्या ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेच्या तयारीला लागला आहे.

By स्वदेश घाणेकर | Published: November 12, 2019 8:22 PM

Open in App

वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतील अपयशानंतर भारतीय संघ लगेचच 2020च्या ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेच्या तयारीला लागला आहे. त्यामुळे वर्ल्ड कप स्पर्धेनंतर आतापर्यंत झालेल्या दोन ट्वेंटी-20 मालिकांमध्ये युवा खेळाडूंना खेळवण्यात आले. कर्णधार विराट कोहली, रोहित शर्मा आणि मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यासह संघ व्यवस्थापनानेही ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेसाठीच्या अंतिम संघाची निवड करण्यासाठी अधिकाधिक युवा खेळाडूंना संधी देणार असल्याचे जाहीर केले. त्यानुसारच आगामी ट्वेंटी-20 मालिकांमध्येही काही नवीन चेहरे टीम इंडियात खेळताना पाहायला मिळतील. पण, वर्ल्ड कप संघासाठी अंतिम 15 खेळाडू कोण असतील याचा आढावा आताच घेता येईल.

वेस्ट इंडिज दौऱ्यावर टीम इंडियात नवदीप सैनी, वॉशिंग्टन सुंदर, खलील अहमद यांना संधी मिळाली. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या ट्वेंटी-20 मालिकेत दीपक चहर, सैनी, सुंदर यांना, तर बांगलादेशविरुद्धच्या मालिकेत खलिल, सुंदर आणि चहर यांना संधी मिळाली. यापैकी सैनी, सुंदर आणि चहर यांनी चांगली छाप पाडली. फलंदाजांत श्रेयस अय्यर व मनीष पांडे यांनीही आपली कामगिरी भूमिका चोख बजावली आहे. माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याच्यानंतर संघ व्यवस्थापन रिषभ पंतकडे मर्यादित षटकांचा यष्टिरक्षक म्हणून ठाम आहे. पंतला सातत्यानं अपयश येत असलं तरी व्यवस्थापन त्याच्या मागे ठामपणे उभी आहे. रोहित शर्मानंही पंतची पाठराखण करताना त्याला वेळ द्या, अशी विनंती केली आहे.

या नव्या चेहऱ्यांना संधी देताना अनुभवी खेळाडूंकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. यात प्रामुख्यानं धोनी, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी यांचा समावेश येतो. यापैकी भूवी विंडीज दौऱ्यापासून दुखापतीमुळे संघाबाहेर आहे. पण, तो दुखापतीतून सारवत आहे आणि आगामी विंडीज मालिकेतूनच तो कमबॅक करण्याची शक्यता आहे. बुमराही तंदुरुस्त होण्यासाठी विश्रांतीवर आहे. त्याचे कमबॅक हे पुढील वर्षीच होणार आहे. शमी तुर्तास तरी ट्वेंटी-20 फॉरमॅटसाठी विचाराधीन नसला तरी युवा गोलंदाजांनी निराश केल्यास, त्याचा विचार होऊ शकतो. धोनी ट्वेंटी-20 वर्ल्ड कप खेळेल, अशी जरी त्याच्या चाहत्यांची अपेक्षा असली तरी तो युवा यष्टिरक्षकांना मार्गदर्शक याच भूमिकेत दिसेल, अशी शक्यता आहे.

त्यामुळे प्रयोग कितीही केले तरी ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत खेळणारे पंधरा खेळाडू हे असतील...रोहित शर्मा, शिखर धवन, लोकेश राहुल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, रिषभ पंत/संजू सॅमसन, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, युजवेंद्र चहल, कृणाल पांड्या, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, दीपक चहर, वॉशिंग्टन सुंदर/नवदीप सैनी.

आगामी ट्वेंटी-20 मालिकेचे वेळापत्रकविरुद्ध वेस्ट इंडिज ( 6 डिसेंबर, 8 डिसेंबर व 11 डिसेंबर)विरुद्ध झिम्बाब्वे ( 5 जानेवारी 2020, 7 जानेवारी, 10 जानेवारी) 

टॅग्स :आयसीसी ट्वेंटी-20 वर्ल्ड कप 2020विराट कोहलीरोहित शर्माशिखर धवनलोकेश राहुलरिषभ पंतभुवनेश्वर कुमारयुजवेंद्र चहलमोहम्मद शामीक्रुणाल पांड्याहार्दिक पांड्यारवींद्र जडेजाबीसीसीआय