टीम इंडियाने वर्चस्व मिळवण्याची संधी गमावली, भारताची ५ बाद १८३ अशी घसरगुंडी

पुन्हा एकदा फलंदाजांनी मोक्याच्या क्षणी नांगी टाकल्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताची दुसºया कसोटीत पहिल्या डावात ५ बाद १८३ धावा अशी घसरगुंडी उडाली.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2018 06:12 AM2018-01-15T06:12:46+5:302018-01-15T06:13:05+5:30

whatsapp join usJoin us
Team India lost the chance of dominating, India slumped to 183 for 5 | टीम इंडियाने वर्चस्व मिळवण्याची संधी गमावली, भारताची ५ बाद १८३ अशी घसरगुंडी

टीम इंडियाने वर्चस्व मिळवण्याची संधी गमावली, भारताची ५ बाद १८३ अशी घसरगुंडी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

सेंच्युरियन : पुन्हा एकदा फलंदाजांनी मोक्याच्या क्षणी नांगी टाकल्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताची दुसºया कसोटीत पहिल्या डावात ५ बाद १८३ धावा अशी घसरगुंडी उडाली. यजमानांचा पहिला डाव ३३५ धावांमध्ये गुंडाळल्यानंतर फलंदाजांच्या निराशाजनक कामगिरीमुळे भारतीय डाव अडचणीत आला. कर्णधार विराट कोहली नाबाद ८५ धावांसह खेळत आहे.
स्पुरस्पोर्ट पार्क मैदानावर गोलंदाजांच्या चांगल्या कामगिरीच्या जोरावर वर्चस्व मिळवलेल्या भारताने दक्षिण आफ्रिकेचा डाव मर्यादित राखत चांगली कामगिरी केली. शिखर धवनच्या जागी संधी देण्यात आलेल्या लोकेश राहुल (१०) याने २ चौकार मारत भारताला चांगली सुरुवातही करून दिली. मात्र, मॉर्नी मॉर्कलने आपल्याच गोलंदाजीवर त्याचा झेल घेत भारताला पहिला झटका दिला. यानंतर पुढच्याच चेंडूवर भरवशाचा चेतेश्वर पुजारा (०) धावबाद झाल्याने भारताची २ बाद २८ अशी अवस्था झाली.
कर्णधार विराट कोहलीने सलामीवीर मुरली विजयसह ७९ धावांची खेळी करत भारताला सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, केशव महाराजने विजयला बाद करून ही जोडी फोडली. त्याने १२६ चेंडूंत ६ चौकारांसह ४६ धावांची खेळी केली. यानंतर ठराविक अंतराने रोहित शर्मा (१०) आणि अनुभवी पार्थिव पटेल (१९) बाद झाल्याने भारताचा डाव ५ बाद १६४ धावा असा घसरला. पहिल्या डावात भारतासाठी मोलाची भूमिका निभावलेल्या अष्टपैलू हार्दिक पंड्याने कोहलीला चांगली साथ देत भारताला सावरले. कोहली १३० चेंडूंत ८ चौकारांसह ८५ धावांवर, तर पंड्या २९ चेंडूत २ चौकारांसह ११ धावांवर खेळत आहे. केशव महाराज, मॉर्नी मॉर्कल, कागिसो रबाडा आणि लुंगी एनगिडी यांनी प्रत्येकी एक बळी घेत भारतीयांना अडचणीत आणले.
तत्पूर्वी, ईशांत शर्मा आणि रविचंद्रन आश्विन यांच्या चांगल्या गोलंदाजीच्या जोरावर भारताने यजमानांचा डाव ३३५ धावांमध्ये संपुष्टात आणला. भारताकडून आश्विन सर्वाधिक यशस्वी गोलंदाज ठरला, त्याने ११३ धावांमध्ये ४ बळी घेतले. तसेच, ईशांतने त्याला चांगली साथ देताना ४६ धावांत ३ बळी घेतले. विशेष म्हणजे दक्षिण आफ्रिकेचे अखेरचे ७ फलंदाज ८९ धावांमध्ये बाद करून भारतीय गोलंदाजांनी पुन्हा एकदा चांगली कामगिरी केली. दुसºया दिवशी ६ बाद २६९ धावांवरुन सुरुवात करताना कर्णधार फाफ डूप्लेसिस (६३) आणि केशव महाराज (१८) यांनी सातव्या बळीसाठी ३१ धावांची भागीदारी केली. यानंतर कागिसो रबाडा याला आश्विनच्या गोलंदाजीवर दोन जीवदान मिळाल्याचा फटका भारताला बसला. प्रथम कर्णधार कोहलीने स्लीपमध्ये त्याचा झेल सोडला, तर यानंतर पंड्याने त्याचा उंच उडालेला झेल सोडला.

शमीने गाठला
शंभर बळींचा टप्पा
भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने रविवारी कसोटी क्रिकेटमध्ये बळींचे शतक पूर्ण केले. अशी कामगिरी करणारा तो जगातील १८२ वा तर भारताचा २१ वा गोलंदाज ठरला.
शमीने दक्षिण आफ्रिकाविरुद्ध दुसºया कसोटी सामन्यादरम्यान केशव महाराजला यष्टिरक्षक पार्थिव पटेलकडे झेल देण्यास भाग पाडत शंभर बळींचा टप्पा गाठला. कारकिर्दीतील २९ वा सामना खेळणारा २७ वर्षीय
शमी १०० कसोटी बळी घेणारा भारताचा सातवा वेगवान
गोलंदाज आहे.

धावफलक :
दक्षिण आफ्रिका : ६ बाद २६९ धावांवरुन पुढे, फाफ डूप्लेसिस त्रि. गो. हार्दिक ६३, केशव महाराज झे. पार्थिव गो. शमी १८, कागिसो रबाडा झे. हार्दिक गो. इशांत ११, मॉर्नी मॉर्कल झे. विजय गो. आश्विन ६, लुंगी एनगिडी नाबाद १. अवांतर - ९. एकूण : ११३.५ षटकात सर्वबाद ३३५ धावा. गोलंदाजी : जसप्रीत बुमराह २२-६-६०-०; शमी १५-२-५८-१; इशांत शर्मा २२-४-४६-३; पांड्या १६-४-५०-०; आश्विन ३८.५-१०-११३-४.
भारत : मुरली विजय झे. डीकॉक गो. महाराज ४६, लोकेश राहुल झे. व गो. मॉर्कल १०, चेतेश्वर पुजारा धावबाद (एनगिडी) ०, विराट कोहली खेळत आहे ८५, रोहित शर्मा पायचीत गो. रबाडा १०, पार्थिव पटेल झे. डीकॉक गो. एनगिडी १९, हार्दिक पांड्या खेळत आहे ११. अवांतर - २. एकूण : ६१ षटकात ५ बाद १८३ धावा. गोलंदाजी : केशव महाराज १६-१-५३-१; मॉर्नी मॉर्कल १५-३-४७-१; वेर्नोन फिलँडर ९-३-२३-०; कागिसो रबाडा १२-०-३३-१; लुंगी एनगिडी ९-२-२६-१.

Web Title: Team India lost the chance of dominating, India slumped to 183 for 5

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.