Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘अ‍ॅशेससाठी संघ निश्चित नाही’, इंग्लंड क्रिकेटचे प्रमुख अँड्र्यू स्ट्रॉस यांनी केले मान्य

इंग्लंड क्रिकेटचे प्रमुख अँड्र्यू स्ट्रॉस यांनी मान्य केले की, अ‍ॅशेस चषक कायम राखण्यासाठी ते अद्याप सर्वोत्तम संघ निश्चित करू शकलेले नाही. इंग्लंड महिनाभरानंतर आॅस्ट्रेलियाला रवाना होईल.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2017 04:28 IST

Open in App

नॉटिंघम : इंग्लंड क्रिकेटचे प्रमुख अँड्र्यू स्ट्रॉस यांनी मान्य केले की, अ‍ॅशेस चषक कायम राखण्यासाठी ते अद्याप सर्वोत्तम संघ निश्चित करू शकलेले नाही. इंग्लंड महिनाभरानंतर आॅस्ट्रेलियाला रवाना होईल.स्ट्रॉस म्हणाले की, ‘संघ संयोजनाबाबत पूर्ण स्पष्टता नाही. मात्र जो रुट हा आॅस्ट्रेलियात अ‍ॅशेस जिंकवून देणारा कर्णधार बनू शकतो. संघाची निवड एका अठवड्यात होण्याची आशा त्यांनी व्यक्त केली. इंग्लंडने मायदेशी झालेल्या मालिकांमध्ये दक्षिण आफ्रिकेला ३-१ आणि वेस्ट इंडिजला २-१ असे पराभूत केले. मात्र दुसºया, तिसºया आणि पाचव्या क्रमांकावर फलंदाजी कोण करेल, हा प्रश्न अजूनही कायम आहे.’