एक संघ म्हणून न्यूझीलंड दौऱ्यातून मिळाली शिकवण - अजिंक्य रहाणे

आखूड टप्प्याच्या चेंडूंची चिंता नाही, वैयक्तिक खेळीचा जास्त विचार करत नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2020 03:43 AM2020-03-12T03:43:32+5:302020-03-12T03:43:50+5:30

whatsapp join usJoin us
Teaching from a tour of New Zealand as a team - Ajinkya Rahane | एक संघ म्हणून न्यूझीलंड दौऱ्यातून मिळाली शिकवण - अजिंक्य रहाणे

एक संघ म्हणून न्यूझीलंड दौऱ्यातून मिळाली शिकवण - अजिंक्य रहाणे

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मुंबई : ‘न्यूझीलंडच्या दौºयातून भारतीय संघाला खूप गोष्टी शिकण्यास मिळाल्या. यजमानांनी नक्कीच चांगला खेळ केला. फलंदाज आणि गोलंदाजांना एक संघ म्हणून या दौºयातून चांगली शिकवण मिळाली,’ अशी प्रतिक्रिया भारतीय कसोटी क्रिकेट संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे याने दिली.

मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमामध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना रहाणेने आपल्या फॉर्मविषयी म्हटले की, ‘मी माझ्या वैयक्तिक खेळाविषयी अधिक चिंतेत नाही. याविषयी मी अधिक विचारही करत नाही. सध्या प्रत्येक मालिका जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा भाग असून, आता आम्ही थेट वर्षाअखेरीस आॅस्टेÑलियामध्ये खेळणार आहोत. त्यामुळे आमच्याकडे आणखी चांगली तयारी करण्यासाठी खूप वेळ आहे. कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत काही सामने जिंकू, मात्र त्याच वेळी काही सामन्यांत पराभवही पत्करावा लागेल.’
न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारतीय फलंदाज आखूड टप्प्याच्या चेंडूंवर अडचणीत आले होते. याविषयी रहाणेने सांगितले की, ‘सध्या संघावर आखूड टप्प्याच्या चेंडूंवर आलेल्या अपयशामुळे बरीच टीका होत आहे. पण याआधी आम्ही मेलबर्नमध्ये अशा चेंडूंविरुद्ध दबदबा राखला होता.’

रहाणेने पुढे सांगितले की, ‘एका सामन्यामुळे तुम्ही आखूड चेंडूंविरुद्धचे वाईट खेळाडू ठरत नाही. न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी वेगवान वाºयाचा चांगल्या प्रकारे फायदा घेतला. तिरप्या कोनातून धावत येऊन वेगवान गोलंदाजी करणे निर्णायक ठरले. हा अनुभव वर्षाअखेरीस होणाºया ऑस्ट्रेलिया दौºयात उपयोगी येईल. त्याआधी एकही कसोटी सामना होणार नसून आॅस्टेÑलिया दौºयासाठीही खूप वेळ आहे. मात्र आम्ही सज्ज आहोत.’

सरकार, गव्हर्निंग काऊन्सिलला घेऊ देत निर्णय
सध्या कोरोना व्हायरसच्या भीतीमुळे यंदाच्या आयपीएल आयोजनावर टांगती तलवार आहे. महाराष्ट्र राज्य यंदाची आयपीएल रद्द करण्याबाबत विचार करत असून याबाबत रहाणेला विचारले असता तो म्हणाला, ‘नक्कीच कोरोनाची समस्या वाढत आहे. मात्र यामुळे आयपीएल व्हावी की नाही, याबाबतचा अंतिम निर्णय राज्य सरकार आणि आयपीएल गव्हर्निंग कौन्सिल यांनी घ्यावा. मी यावर बोलणे उचित ठरणार नाही.’

Web Title: Teaching from a tour of New Zealand as a team - Ajinkya Rahane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.