Join us

आरसीबीचे शिबिर सुरू; पण विराट कोहलीची प्रतीक्षा

अनेक स्थानिक खेळाडू नवे मुख्य कोच ॲन्डी फ्लॉवर आणि क्रिकेट संचालक मो बबाट यांच्या मार्गदर्शनात शिबिरात दाखल झाले.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2024 08:23 IST

Open in App

बंगळुरू : आरसीबीने आयपीएल २०२४ च्या तयारीचा भाग म्हणून शिबिराची सुरुवात केली आहे. स्टार फलंदाज विराट कोहली हा अद्याप दाखल झालेला नाही. तो लवकरच संघासोबत जुळेल, असे सांगितले जात आहे.

आरसीबीला २२ मार्च रोजी गतविजेत्या सीएसकेविरुद्ध सलामीला सामना खेळायचा आहे. अनेक स्थानिक खेळाडू नवे मुख्य कोच ॲन्डी फ्लॉवर आणि क्रिकेट संचालक मो बबाट यांच्या मार्गदर्शनात शिबिरात दाखल झाले.

कर्णधार फाफ डुप्लेसिस आणि वेस्ट इंडीजचा वेगवान गोलंदाज अल्झारी जोसेफ हेदेखील शिबिरात दाखल झाले आहेत. कोहली हा पितृत्व रजेमुळे इंग्लंडविरुद्ध नुकत्याच झालेल्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत खेळला नव्हता. बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितले की, ‘कोहली पुढील काही दिवसांत शिबिरात दाखल होईल. ‘आरसीबी अनबॉक्स’ या कार्यक्रमालादेखील कोहली हजेरी लावू शकतो.’

 

टॅग्स :आयपीएल २०२४रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविराट कोहली