Join us  

आम्हीच रचला आमच्या यशाचा पाया...

आयपीएल २०२२ अंतिम टप्प्यात आहे. प्ले ऑफची चढाओढ कायम आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2022 8:46 AM

Open in App

मतीन खान, स्पोर्ट्‌स हेड - सहायक उपाध्यक्ष लोकमत पत्रसमूह

आयपीएल २०२२ अंतिम टप्प्यात आहे. प्ले ऑफची चढाओढ कायम आहे. रविवारपर्यंत ६३ सामने पार पडले. यातून अनेक रंजक गोष्टी पुढे आल्या. त्यातही षटकार मारण्याच्या बाबतीत अव्वल दोन संघांची रणनीती किती दमदार होती हे कळले. गुणतालिकेवर नजर टाकल्यास २० गुणांसह अव्वल असलेला गुजरात टायटन्स षटकारांबाबत दुसऱ्या स्थानावर असलेला राजस्थान रॉयल्सच्या तुलनेत मागे आहे.  रॉयल्सने ११२, तर गुजरातने केवळ ५९ षटकार मारले. रॉयल्सने आयपीएल इतिहासात सर्वाधिक षटकार ठोकण्याचा विक्रमदेखील नोंदविला. या संघाचा सलामीवीर जोस बटलरने ३७ षटकारांचा पाऊस पाडला, हे विशेष.

षटकार खेचण्यात राजस्थानचे खेळाडू मातब्बर ठरले. पाठोपाठ आंद्रे रसेल (केकेआर) १३ सामन्यात ३२ आणि लियाम लिव्हिंगस्टोन (पंजाब) १२ सामन्यांत २९ षटकार मारून  लगाकर क्रमश: दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहेत. तरीही सांगू इच्छितो की, टी-२० हा प्रकार केवळ षटकारांचा खेळ नाही. गुजरातने हे सिद्ध केले. या संघाकडे पाहून म्हणावे लागेल की, फलंदाज षटकार खेचू शकले नसतीलही; पण संघाला विजय मिळवून देण्यात ते यशस्वी ठरले.

हार्दिक पांड्याने अत्यंत कौशल्यपूर्वक गुजरातचे नेतृत्व केले. फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही क्षेत्रांत गुजरातने अव्वल कामगिरी बजावली. या बळावर संघ सर्वोत्कृष्ट बनू शकला. गोलंदाजीत मोहम्मद शमी  १८, राशीद १६ आणि फर्ग्युसनने १२ बळी घेत फलंदाजांसाठी कर्दनकाळ बनले. फलंदाजीत शुभमन गिल ४०२, पांड्या ३५१, मिलर ३४७ आणि मॅचविनर राहुल तेवतिया २१५ यांची कामगिरी प्रशंसनीय ठरली. प्ले ऑफमध्ये या संघाची कसोटी लागणे शिल्लक आहे, तरीही गुजरातने आतापर्यंतच्या कामगिरीच्या जोरावर सिद्ध केले की, अपना जमाना आप बनाते हैं अहले दिल, हम वो नहीं कि जिनको जमाना बना गया!

टॅग्स :आयपीएल २०२२
Open in App