टी-२० विश्वचषक यूएईत होणार, तारीखही ठरली

बीसीसीआयचे संकेत: कोरोनामुळे भारतात आयोजन कठीण, खेळाडूंच्या सुरक्षेला प्राधान्य

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2021 05:25 AM2021-06-27T05:25:04+5:302021-06-27T05:25:22+5:30

whatsapp join usJoin us
The T20 World Cup will be held in the UAE | टी-२० विश्वचषक यूएईत होणार, तारीखही ठरली

टी-२० विश्वचषक यूएईत होणार, तारीखही ठरली

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्दे१७ ऑक्टोबरला होणार सुरुवात

नवी दिल्ली : कोरोना काळात खेळाडूंच्या सुरक्षेला सर्वाच्च प्राधान्य देण्याच्या हेतूने बीसीसीआयच्या यजमानपदाखाली आगामी टी-२० विश्वचषकाचे आयोजन भारताऐवजी संयुक्त अरब अमिरातमध्ये होऊ शकते, असे संकेत सचिव जय शाह यांनी शनिवारी दिले. याबाबत अधिकृत निर्णय लवकरच होईल, असेही ते म्हणाले.

कोरोनावर आमची नजर असून देशातील परिस्थिती पाहता हे आयोजन यूएईत हलविले जाऊ शकते. आमच्यासाठी खेळाडूंची सुरक्षा आणि आरोग्य महत्त्वाचे असून लवकरच निर्णय घेतला जाईल,’ असे शाह यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना स्पष्ट केले. 
योजनेनुसार टी-२० विश्वचषकाची पहिली फेरी आठ संघांदरम्यान दोन गटात खेळविली जाईल. एकूण १२ सामने ओमानमध्ये होतील.

१७ ऑक्टोबरला होणार सुरुवात
ईएसपीएन क्रिकइन्फोनुसार यंदा आयपीएलचे उर्वरित सामने यूएईत १९ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर या कालावधीत खेळविले जातील. त्यानंतर दोन दिवसांनी म्हणजे १७ ऑक्टोबर रोजी टी-२० विश्वचषकाला प्रारंभ होईल. १६ संघांचा समावेश असलेल्या विश्वचषकाचा अंतिम सामना १४ नोव्हेंबर रोजी होणे अपेक्षित आहे.

Web Title: The T20 World Cup will be held in the UAE

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.