Join us  

T20 World Cup, SL vs NED : श्रीलंकेच्या गोलंदाजांनी कमाल केली, Super 12 मध्ये खेळण्याआधीच प्रतिस्पर्धींना ताकद दाखवली

श्रीलंकेला ग्रुप १ मध्ये इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज आणि बांगलादेशचा सामना करावा लागणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2021 9:32 PM

Open in App

T20 World Cup, SRI LANKA V NETHERLANDS : श्रीलंकेनं Round 1च्या अखेरच्या साखळी सामन्यात मोठ्या विक्रमासह दणदणीत विजय मिळवला. श्रीलंकेच्या गोलंदाजांनी कमाल करताना नेदरलँड्सचा संपूर्ण संघ ४४ धावांवर माघारी पाठवला. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील ही दुसरी निचांक धावसंख्या ठरली. यापूर्वी २०१४मध्येही श्रीलंकेनंच ३९ धावांवर नेदरलँड्सलाच गुंडाळले होते. गोलंदाजांच्या उल्लेखनीय कामगिरीनंतर फलंदाजांनी सहज विजय मिळवला. श्रीलंकेनं ग्रुप अ मधून अव्वल स्थानासह Super 12 मध्ये ग्रुप १मध्ये स्थान निश्चित केलं.

नेदरलँड्सच्या बेन कूपर ( १०) व कॉलिन अॅकर्मन ( ११) वगळता अन्य फलंदाज एकेरी धावेतच तंबूत परतले. वनिंदू हसरंगानं ३ षटकांत ९ धावांत ३ फलंदाज बाद केले. लाहिरु कुमारानंही ३ षटकांत ७ धावांत ३ विकेट घेतल्या आणि त्यानं एक निर्धाव षटकही फेकलं. महिष थिक्षणा ( २-३) व दुष्मंथा चमीरा ( १-१४) यांनीही उत्तम गोलंदाजी केली. ४५ धावांचे लक्ष्य पार करण्यासाठी श्रीलंकेच्या दोन फलंदाजांनी विकेट टाकल्या. कुसल परेरानं एकाकी खिंड लढवताना नाबाद ३३ धावा करून ८ विकेट्स व ७७ चेंडू राखून विजय पक्का केला.  

टॅग्स :ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२१श्रीलंका
Open in App