Join us  

T20 World Cup: टीम इंडियाच्या पराभवानंतर काय म्हणाली पाकिस्तानची मिस्ट्री गर्ल? दिली अशी रिअ‍ॅक्शन

नताशा ऑस्ट्रेलियातच राहते. ती मुळची पाकिस्तानी असून मेलबर्नमध्ये राहते. न्युझीलंड विरुद्धचा सामना संपल्यानंतर एका इंटरव्ह्यूमध्ये नसीम शाह आपला आवडता गोलंदाज असल्याचेही नताशाने म्हटले होते.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2022 8:36 PM

Open in App

T20 विश्वचषक-2022 च्या उपांत्य फेरीत आज टीम इंडियाचा पराभव झाला. अ‍ॅडलेड येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात इंग्लंडने टीम इंडियाचा 10 गडी राखून पराभव केला. या पराभवामुळे भारतीय क्रिकेट फॅन्स अत्यंत निराश झाले आहेत. कारण, या पराभवामुळे टीम इंडियाचे आयसीसी ट्रॉफी जिंकण्याचे स्वप्न पुन्हा एकदा भंगले. महत्वाचे म्हणजे, भारतीय संघाला तब्बल 9 वर्षांपासून एकही ICC ट्रॉफी जिंकता आलेली नाही.

टीम इंडियाच्या पराभवानंतर, पाकिस्तानची 'मिस्ट्री गर्ल' नताशा हिने रिअ‍ॅक्ट झाली आहे. नताशा कल (बुधवार) झालेल्या न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या सेमीफायनलच्या सामन्यानंतर चर्चेत आली आहे. ती सिडनीमध्ये पाकिस्तान संघाला प्रोत्साहित करताना दिसून आली होती. सामना सुरू असताना अनेक वेळा कॅमेरामनचा फोकस नताशावर होता. ती सोशल मीडियावरही प्रचंड व्हायरल झाली. 

पाकिस्तानच्या मिस्ट्री गर्लची रिअ‍ॅक्शन -नताशा ऑस्ट्रेलियातच राहते. ती मुळची पाकिस्तानी असून मेलबर्नमध्ये राहते. न्युझीलंड विरुद्धचा सामना संपल्यानंतर एका इंटरव्ह्यूमध्ये नसीम शाह आपला आवडता गोलंदाज असल्याचेही नताशाने म्हटले होते. आता नताशाने टीम इंडियाच्या पराभवावर ट्विट केले आहे. तिने आपल्या ट्विटमध्ये Bye Bye India, असे लिहिले आहे.

इग्लंडकडून भारताचा लाजिरवाणा पराभव - टी-20 विश्वचषक 2022 च्या दुसऱ्या उपांत्य फेरीत भारताचा इंग्लंडकडून लाजिरवाणा पराभव झाला. प्रथम फलंदाजी करताना भारताने 20 षटकांत 6 बाद 168 धावा केल्या होत्या. ज्याचा  पाठलाग करताना इंग्लिश संघाने 10 गडी राखून सहज विजय मिळवला. 

भारताकडून विराट कोहली आणि हार्दिक पांड्या यांनी शानदार अर्धशतकी खेळी केली. मात्र भारतीय गोलंदाजांना इंग्लंडचा एकही बळी मिळवता आला नाही. अखेर इंग्लिश संघाने 16 षटकांतच 169 धावा करत फायनलमध्ये प्रवेश केला. इंग्लंडकडून सलामीवीर कर्णधार जोस बटलर आणि ॲलेक्स हेल्स यांनी अनुक्रनमे 80 आणि 89 धावांची नाबाद खेळी केली.

टॅग्स :ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२२भारत विरुद्ध इंग्लंडपाकिस्तानविश्वचषक ट्वेन्टी-२०
Open in App