Join us  

T20 World Cup Semi Final : "सरकारने ओरिओवर बंदी घातली पाहिजे!" भारताच्या पराभवानंतर सोशल मीडियावर का ट्रेंड होतंय oreo बिस्कीट?

भारतीय संघाला तब्बल 9 वर्षांपासून एकही ICC ट्रॉफी जिंकता आलेली नाही. भारताच्या या पराभवानंतर, बिस्किट कंपनी ओरिओ (Oreo) सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2022 12:41 AM

Open in App

T20 विश्वचषक-2022 च्या उपांत्य फेरीत आज टीम इंडियाचा लाजिरवाणा पराभव झाला. अ‍ॅडलेड येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात इंग्लंडने टीम इंडियाचा 10 गडी राखून पराभव केला. या पराभवामुळे भारतीय क्रिकेट फॅन्स अत्यंत निराश झाले आहेत. कारण, या पराभवामुळे टीम इंडियाचे आयसीसी ट्रॉफी जिंकण्याचे स्वप्न पुन्हा एकदा भंगले आहे. महत्वाचे म्हणजे, भारतीय संघाला तब्बल 9 वर्षांपासून एकही ICC ट्रॉफी जिंकता आलेली नाही. भारताच्या या पराभवानंतर, बिस्किट कंपनी ओरिओ (Oreo) सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे. 

बिस्किट कंपनी ओरिओ सोबतच, महेंद्र सिंह धोनीवरही निशाना साधला जात आहे. या मागचे कारण म्हणजे, T20 विश्वचषक सुरू होण्यापूर्वी धोनीने Oreo बिस्किटचे री-लॉन्चिंग केले होते. यावेळी धोनी म्हणाला होता, 2011 मध्येही Oreo लॉन्च करण्यात आले होते आणि तेव्हा भारताने वर्ल्ड कप जिंकला होता. एवढेच नाही, तर जर Oreo पुन्हा लॉन्च करण्यात आला, तर भारताला विजय मिळेल, असेही त्याने म्हटले होते.

या लॉन्चिंग कार्यक्रमात म्हणण्यात आले होते, '2011 मध्ये Oreo लॉन्च करण्यात आले होते आणि 2011 मध्ये भारत वर्ल्ड कप जिंकला होता. या वर्षी आणखी एक कप आहे. जर Oreo पुन्हा लॉन्च करण्यात आला, तर भारत पुन्हा कप जिंकू शकतो त्यामुळे Oreo पुन्हा लॉन्च करण्यात यावा.' मात्र, आता इंग्लंडने भारताचा पराभव केला आहे. यामुळे, Oreo आणि महेंद्र सिंह धोनीवर प्रश्न उपस्थित केले जात आहे. यासंदर्भात @theprayagtiwari नावाच्या एक युजरने, ''Oreo' के ऊपर 'कुदरत का निजाम' भारी पड गया,' असे म्हटले आहे. 

सोशल मीडियावर एका युजरने ओरिओ बिस्किटचा पुडा पोस्ट करत लिहिले आहे, "धोनी प्लीज रिप्लाय, यांचे काय करू, खाऊ की ODI वर्ल्ड कप पर्यंत सांभाळून ठेऊ?"

भारताच्या पराभवानंतर, सोशल मीडियावर आणखी एका युजरने म्हटले आहे,  "भारत सरकारने ओरिओवर बंदी घातली पाहिजे."

आणखी एका युजरने लिहिले आहे, "आता इथून पुढे कधीच ओरिओ खाणार नाही."

भारताच्या पराभवानंतर काही युजर्सनी Oreo बिस्किट तोडून प्रतिक्रिया दिली आहे.

इग्लंडकडून भारताचा लाजिरवाणा पराभव - टी-20 विश्वचषक 2022 च्या दुसऱ्या उपांत्य फेरीत भारताचा इंग्लंडकडून लाजिरवाणा पराभव झाला. प्रथम फलंदाजी करताना भारताने 20 षटकांत 6 बाद 168 धावा केल्या होत्या. ज्याचा  पाठलाग करताना इंग्लिश संघाने 10 गडी राखून सहज विजय मिळवला. 

भारताकडून विराट कोहली आणि हार्दिक पांड्या यांनी शानदार अर्धशतकी खेळी केली. मात्र भारतीय गोलंदाजांना इंग्लंडचा एकही बळी मिळवता आला नाही. अखेर इंग्लिश संघाने 16 षटकांतच 169 धावा करत फायनलमध्ये प्रवेश केला. इंग्लंडकडून सलामीवीर कर्णधार जोस बटलर आणि ॲलेक्स हेल्स यांनी अनुक्रनमे 80 आणि 89 धावांची नाबाद खेळी केली. 

टॅग्स :ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२२भारत विरुद्ध इंग्लंडविश्वचषक ट्वेन्टी-२०महेंद्रसिंग धोनी
Open in App