Join us  

T20 World Cup, Sania Mirza : भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशी सानिया मिर्झानं आखलाय प्लान; घेतला मोठा निर्णय

ओमान विरुद्ध पपुआ न्यू गिनी यांच्या लढतीनं ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेला आजपासून सुरुवात झाली. स्पर्धेतील Round 1चे सामने सुरूवातीला खेळवले जातील आणि २३ ऑक्टोबरपासून Super 12 च्या लढतींना सुरुवात होणार.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2021 4:04 PM

Open in App

ओमान विरुद्ध पपुआ न्यू गिनी यांच्या लढतीनं ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेला आजपासून सुरुवात झाली. स्पर्धेतील Round 1चे सामने सुरूवातीला खेळवले जातील आणि २३ ऑक्टोबरपासून Super 12 च्या लढतींना सुरुवात होणार. २४ ऑक्टोबरला भारत-पाकिस्तान यांच्यातला सामना होणार आहे आणि या लढतीसाठी टेनिसपटू सानिया मिर्झा ( Sania Mirza) हिनं वेगळाच प्लान आखला आहे. भारतीय टेनिसपटूनं पाकिस्तानचा माजी कर्णधार शोएब मलिक ( Shoaib Malik) याच्याशी लग्न केलं आहे. त्यामुळे भारत-पाकिस्तान लढतीत ती नेमकं कोणाला चिअर करेल, याची उत्सुकता यंदाही आहे. पण, सानियाच्या मनात काही वेगळंच आहे आणि तिनं मोठा निर्णय जाहीर केला. 

भारत-पाकिस्तान सामना असला की सानिया मिर्झाला नेटिझन्सच्या रोषाचा सामना करावा लागतो. तिच्यावर खालच्या भाषेत टिप्पणी केली जाते. यंदा हा मनस्ताप टाळण्यासाठी सानियानं India vs Pakistan सामन्याच्या दिवशी सोशल मीडियावरून गायब होण्याचा निर्णय घेतला आहे.  इंस्टाग्रामवर तिनं पोस्ट लिहून ही माहिती दिली आहे.  

 पाकिस्ताननं २००९साली यूनुस खानच्या नेतृत्वाखाली ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जिंकला होता. २००७च्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप संघात शोएब मलिक हा पाकिस्तानचा कर्णधार होता आणि २००९च्या वर्ल्ड कप विजेत्या संघाचाही तो सदस्य होता. त्याशिवाय त्यानं २०१२, २०१४ व २०१६च्या स्पर्धेतही संघाचे प्रतिनिधित्व केलं आहे. मात्र, वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी निवड समितीनं युवा खेळाडूंवर भरवसा दाखवत त्याला संघाबाहेर ठेवले. मलिकनं मागील वर्षभरात जगभरातील ट्वेंटी-२० लीगमध्ये प्रतिनिधित्व करताना ४९ सामन्यांत ३०.८५च्या सरासरीनं धावा केल्या आहेत. पाकिस्तानकडून सर्वाधिक आयसीसी स्पर्धा खेळण्याचा विक्रम मलिकनं केला आहे. त्यानं दोन वन डे वर्ल्ड कप ( २०११ व २०१५), सहा चॅम्पियन्स ट्रॉफी व सहा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धांमध्ये पाकिस्तानचे प्रतिनिधित्व केले आहे. 
टॅग्स :भारत विरुद्ध पाकिस्तानट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२१सानिया मिर्झा
Open in App