T20 World Cup, SA vs BAN : Rilee Rossouw चे विश्वविक्रमी शतक; दक्षिण आफ्रिकेच्या दोनशेपार धावा, बांगलादेशसमोर तगडे आव्हान 

बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी १६३ धावांची विक्रमी भागीदारी केली आणि ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासातील ही सर्वोत्तम भागीदारी ठरली.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2022 10:39 AM2022-10-27T10:39:22+5:302022-10-27T10:40:07+5:30

whatsapp join usJoin us
T20 World Cup, SA vs BAN : Rilee Rossouw ( 109 & Quinton de Kock ( 63) registered record breaking 163 runs partnership, Bangladesh need 206 to defeat South Africa | T20 World Cup, SA vs BAN : Rilee Rossouw चे विश्वविक्रमी शतक; दक्षिण आफ्रिकेच्या दोनशेपार धावा, बांगलादेशसमोर तगडे आव्हान 

T20 World Cup, SA vs BAN : Rilee Rossouw चे विश्वविक्रमी शतक; दक्षिण आफ्रिकेच्या दोनशेपार धावा, बांगलादेशसमोर तगडे आव्हान 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

T20 World Cup, South Africa vs Bangladesh : पावसाच्या व्यत्ययानंतर क्विंटन डी कॉक ( Quinton de Kock) व रिली रोसोवू ( Rilee Rossouw) यांनी षटकारांचा पाऊस पाडला. बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी १६३ धावांची विक्रमी भागीदारी केली आणि ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासातील ही सर्वोत्तम भागीदारी ठरली. रोसोवूने ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये सलग दुसरे शतक झळकावून मोठा विक्रम नोंदवला. त्याच्या दमदार खेळीच्या जोरावर आफ्रिकेने दोनशे पार धावा कुटल्या, परंतु बांगलादेशने अखेरच्या ५ षटकांत चांगले कमबॅक केले.  

१४ चेंडूंत ७० धावा! Rilee Rossouw ने झळकावले वर्ल्ड कपमधील वादळी शतक; क्विंटनसह विक्रमी भागीदारी 


कर्णधार टेम्बा बवुमा ( २) अपयशी ठरला.सहाव्या षटकात पावसाचे आगमन झाले अन् २० मिनिटं खेळ थांबला. आफ्रिकेने सहा षटकांत १ बाद ६३ धावा केल्या आणि या वर्षातील पॉवर प्लेमधील ही त्यांची सर्वोत्तम धावसंख्या ठरली. क्विंटन डी कॉक आणि रिली रोसोवू यांनी बांगलादेशच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. या दोघांनी ८५ चेंडूंत १६३ धावांची विक्रमी भागीदारी केली.  ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील आफ्रिकेकडून ही सर्वोत्तम भागीदारी ठरली. यापूर्वी, २००७ मध्ये हर्षल गिब्स व जस्टीन केम्प यांनी वेस्ट इंडिजविरुद्ध नाबाद १२० धावांची भागीदारी केली होती. शिवाय ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासातील ही सर्वोत्तम भागीदारी ठरली. क्विंटन ३८ चेंडूंत ७ चौकार व ३ षटकारांच्या मदतीने ६३ धावांवर बाद झाला.


आफ्रिकेला अखेरच्या षटकात वेगाने धावा करण्यात अपयश आले. रोसोवू ५६ चेंडूंत ७ चौकार व ८ षटकारांच्या मदतीने १०९ धावांवर झेलबाद झाला. शाकिब अल हसनने ही विकेट मिळवून दिली. आफ्रिकेला अखेरच्या ५ षटकांत २९ धावाच करता आल्या आणि ३ विकेट्स गमावल्या. आफ्रिकेला ५ बाद २०५ धावांपर्यंत मजल मारता आली. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: T20 World Cup, SA vs BAN : Rilee Rossouw ( 109 & Quinton de Kock ( 63) registered record breaking 163 runs partnership, Bangladesh need 206 to defeat South Africa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.