T20 World Cup, NZ vs SCO : ६,६,६,६,६,६,६..; मार्टिन गुप्तीलची वादळी खेळी; मोडला रोहित शर्माचा विक्रम, संघासाठी शतकावर सोडलं पाणी,  Video 

T20 World Cup, NEW ZEALAND V SCOTLAND : न्यूझीलंडच्या मार्टिन गुप्तीलनं बुधवारी स्कॉटलंडविरुद्ध वादळी खेळी केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2021 05:35 PM2021-11-03T17:35:56+5:302021-11-03T17:36:43+5:30

whatsapp join usJoin us
T20 World Cup, NZ vs SCO : Martin Guptill's brilliant 93 helps New Zealand to post 5/172 against Scotland, he break many records, video | T20 World Cup, NZ vs SCO : ६,६,६,६,६,६,६..; मार्टिन गुप्तीलची वादळी खेळी; मोडला रोहित शर्माचा विक्रम, संघासाठी शतकावर सोडलं पाणी,  Video 

T20 World Cup, NZ vs SCO : ६,६,६,६,६,६,६..; मार्टिन गुप्तीलची वादळी खेळी; मोडला रोहित शर्माचा विक्रम, संघासाठी शतकावर सोडलं पाणी,  Video 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

T20 World Cup, NEW ZEALAND V SCOTLAND : न्यूझीलंडच्या मार्टिन गुप्तीलनं बुधवारी स्कॉटलंडविरुद्ध वादळी खेळी केली. शतकाच्या उंबरठ्यावर असतानाही त्यानं संघाचा विचार केला अन् धावा करण्याच्या प्रयत्नात स्वतःची विकेट गमावून माघारी परतला. पण, त्याच्या फटकेबाजीनं आज मोठे विक्रम केले आणि न्यूझीलंडनं ५ बाद १७२ धावांचा डोंगर उभा केला. मार्टिननं या सामन्यात रोहित शर्माचा विक्रम मोडला आणि विराट कोहलीच्या पंक्तित जाऊन बसला. 

प्रथम फलंदाजीला आलेल्या न्यूझीलंडची सुरुवात निराशाजनक झाली. डॅरील मिचेल ( १३), केन विलियम्सन ( ०) व डेव्हॉन कॉनवे ( १) हे आज फार कमाल करू शकले नाही. पण, मार्टिन गुप्तील ( Martin Guptill) हा एकटा भिडला. या सामन्यात त्यानं तुफान फटकेबाजी केली. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०त १५० षटकार खेचणारा तो पहिलाच फलंदाज ठरला. या सामन्यात त्यानं विराट कोहलीनंतर आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०त ३०००+ धावांचा पल्लाही पार केला.  १९व्या षटकात शतकाच्या उंबरठ्यावर गुप्तील बाद झाला. त्यानं ५६ चेंडूंत ६ चौकार व ७ षटकारासह ९३ धावा केल्या. न्यूझीलंडनं ५ बाद १७२ धावा केल्या.  

यंदाच्या वर्षात गुप्तील दुसऱ्यांना ट्वेंटी-२०त शतकापासून थोडक्यात दूर राहिला. आजच्या लढतीपूर्वी त्यानं ९७ धावांवर माघारी जावं लागलं होतं. २०१८मध्ये शिखर धवन ९० व ९२ धावांवर बाद झाला होता.  गुप्तीलच्या नावावर १५० षटकार झाले असून त्यानं रोहित शर्माला ( १३४) मागे टाकले. ख्रिस गेल ( १२२), इयॉन मॉर्गन ( ११९), एव्हिन लुईस ( ११०) व आरोन फिंच ( १०९) हे अव्वल सहामध्ये आहेत.  ट्वेंटी-२०त सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांत विराट ३२२५ धावांसह अव्वल स्थानावर आले आणि आता गुप्तीलनं ३००० धावांचा पल्ला ओलांडला आहे. त्यानंतर रोहित शर्मा ( २८७८), पॉल स्टिर्लिंग ( २५७०) व आरोन फिंच ( २५५४) यांचा क्रमांक येतो.  

पाहा व्हिडीओ..

Web Title: T20 World Cup, NZ vs SCO : Martin Guptill's brilliant 93 helps New Zealand to post 5/172 against Scotland, he break many records, video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.