Join us  

T20 World Cup, IREvNED : ७ चेंडू, ७ विकेट्स!, आयर्लंडच्या गोलंदाजांसमोर ऑरेंज आर्मी ढेपाळली, ट्वेंटी-२० वर्ल्ड कपमध्ये इतिहासाची नोंद झाली

T20 World Cup, IRELAND V NETHERLANDS - आयर्लंडच्या गोलंदाजांनी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत सोमवारी नेदरलँड्सविरुद्धच्या सामन्यात अफलातून कामगिरी केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2021 5:37 PM

Open in App

T20 World Cup, IRELAND V NETHERLANDS - आयर्लंडच्या गोलंदाजांनी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत सोमवारी नेदरलँड्सविरुद्धच्या सामन्यात अफलातून कामगिरी केली. आयर्लंडच्या कर्टीस कॅम्फेरनं ४ चेंडूंत ४ विकेट्स घेताना इतिहास घडवला. ट्वेंटी-२० सामन्यात असा पराक्रम करणारा तो लसिथ मलिंगा व राशिद खान यांच्यानंतरचा तिसरा गोलंदाज असला तरी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत प्रथमच हा पराक्रम झाला. सामन्याच्या १०व्या षटकात कॅम्फेरनं हे धक्के दिल्यानंतर अखेरच्या षटकाच्या तीन चेंडूवर नेदरलँड्सनं सलग तीन विकेट्स गमावल्या. त्यामुळे त्यांना १०६ धावांवरच समाधान मानावे लागले. 

नाणेफेक जिंकून नेदरलँड्सनं प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. परंतु त्यांचा ६ फलंदाज अवघ्या ५१ धावांवर माघारी परतले. विशेष म्हणजे चार फलंदाज एकही धावाची भर न घालता तंबूत गेले. बेन कूपर ( ०) पहिल्याच षटकात धावबाद झाला. बॅस डे लीड ( ७)  यानं खेळपट्टीवर टीकण्याचा प्रयत्न केला, परंतु जोशुआ लिटल यानं त्याला बाद केले. त्यानंतर तिसऱ्या विकेटसाठी आयर्लंडला १०व्या षटकापर्यंत प्रतीक्षा करावी लागली. पण, या प्रतिक्षेचं फळ मिळालं अन् तेही एक-दोन नव्हे तर चार फलंदाजांच्या रुपानं. कर्टीस कॅम्फेरनं १०व्य़ा षटकाच्या दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या व पाचव्या अशा सलग चार चेंडूंवर चार विकेट्स घेत इतिहास घडवला.   

  • ९.२ चेंडू - कॉलिन अॅकर्मन झे. नेल रॉक गो. कर्टीस कॅम्फेर ११ ( १६)
  • ९.३ चेंडू - रियान टेन डोएश्चॅट पायचीत गो. कर्टीस कॅम्फेर ० ( १)
  • ९.४ चेंडू - स्टॉट एडवर्ड्स पायचीत गो. कर्टीस कॅम्फेर ० (१)
  • ९.५ चेंडूं- रोएलॉफ व्हॅन डेर मर्वे त्रि. गो. कर्टीस कॅम्फेर ० ( १)  

२००७नंतर ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत हॅटट्रिक घेणारा कर्टीस हा पहिलाच फलंदाज ठरला. २००७मध्ये ऑस्ट्रेलियाच्या ब्रेट लीनं बांगलादेशविरुद्ध हा विक्रम नोंदवला होता.  पण, कर्टीस हा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत ४ चेंडूंत ४ विकेट्स घेणारा जगातला पहिलाच गोलंदाज ठरला. ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये लसिथ मलिंगा व राशिद खान यांनी हा पराक्रम केला आहे, परंतु त्यांना वर्ल्ड कप स्पर्धेत अशी कामगिरी करता आली नाही. मलिंगा ( वि. न्यूझीलंड) आणि राशिद ( वि. आयर्लंड) यांनी २०१९मध्ये हा पराक्रम केला होता.   

मार्क एडर यानं टाकलेल्या २०व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर पीटर सीलार ( २१) झेलबाद झाला, पाचव्या चेंडूवर लोगान व्हॅन बिक ( ११) धावबाद झाला अन् सहाव्या चेंडूवर ब्रँडन ग्लोव्हर ( ०) झेलबाद झाला. नेदरलँड्सकडून सलामीवीर मॅक्स ओ'डोवडनं ५१ धावांची खेळी केली. कॅम्फेरनं २६ धावांत ४, मार्क एडरनं ९ धावांत ३ विकेट्स घेतल्या. या सामन्यात पाच फलंदाज गोल्डन डकवर बाद झाले आणि ट्वेंटी-२० क्रिकेटच्या इतिहासात असं प्रथमच घडले.  

टॅग्स :ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२१आयर्लंड
Open in App