Join us  

T20 World Cup, IND vs ZIM : चार चेंडूंत विराट कोहली, लोकेश राहुल माघारी परतले; झिम्बाब्वेने भारताला ३ मोठे धक्के दिले, Video 

T20 World Cup, India vs Zimbabwe Live : भारताने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील अखेरच्या साखळी सामन्यात झिम्बाब्वेसमोर तगडे आव्हान उभे करण्याच्या दिशेने वाटचाल केली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 06, 2022 2:37 PM

Open in App

T20 World Cup, India vs Zimbabwe Live : भारताने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील अखेरच्या साखळी सामन्यात झिम्बाब्वेसमोर तगडे आव्हान उभे करण्याच्या दिशेने वाटचाल केली आहे. उपांत्य फेरीतील प्रवेश निश्चित केल्यानंतर भारतीय संघ तणावमुक्त खेळला, परंतु कर्णधार रोहित शर्माने अपयशाचा पाढा गिरवला. लोकेश राहुलची ( KL Rahul) बॅट आज चांगलीच तळपली आणि त्याला विराट कोहलीची ६० धावांच्या भागीदारीची साथ मिळाली. पण, चार चेंडूंत भारताला दोन मोठे धक्के बसले.

 MS Dhoni चा 'ओरियो' योगायोग खरा ठरणार! भारतच T20 World Cup जिंकणार

भारतीय संघाने ग्रुप २ मधील अखेरच्या सामन्यात झिम्बाब्वेविरुद्ध प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. अखेर रिषभ पंतला संधी देण्याचा निर्णय रोहित शर्माने घेतला. युजवेंद्र चहल यालाही आजच्या लढतीत विश्रांती दिली गेली आहे. दिनेश कार्तिकच्या फिटनेसवर प्रश्नचिन्ह नक्की उपस्थित केला जाऊ शकतो. आजचा सामना जिंकून ग्रुप २ मधून टॉप स्थान पटकावत उपांत्य फेरीत जाण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न असेल आणि रोहित व लोकेश राहुल यांनी सुरूवात तशी केली. परंतु, रोहित पुन्हा एकदा मोठी खेळी करण्यात चुकला. कर्णधारपदाचा दबाव त्याला पेलवत नसल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले. ब्लेसिंग मुझाराबनीच्या चेंडूवर पुल शॉट मारण्याच्या प्रयत्नात रोहित १५ धावांवर झेलबाद झाला.

लोकेशने फटकेबाजी सुरू ठेवली आणि विराट कोहली सावध खेळ करताना विकेट टिकवून होता. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करताना संघाला १० षटकांत १ बाद ७९ धावांपर्यंत पोहोचवले. सीन विलियम्स गोलंदाजीला आला आणि पहिल्याच षटकात त्याने विराटची विकेट मिळवली. फटका मारण्याच्या प्रयत्नात विराट २६ धावांवर झेलबाद झाला आणि ६० धावांची भागीदारीही संपुष्टात आली. लोकेशने खणखणीत षटकात खेचून ३४ चेंडूंत ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील पाचवे अर्धशतक पूर्ण केले. पण, पुढच्याच चेंडूवर तो झेलबाद झाला. लोकेशने ३५ चेंडूंत ३ चौकार व ३ षटकारांसह ५१ धावा केल्या. 

 

  

आज संधी मिळालेला रिषभ पंत ३ धावांवर माघारी परतला. विलियम्सनच्या गोलंदाजीवर बर्लने सीमारेषेवर सुरेख झेल टिपला. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"  

 

टॅग्स :ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२२भारत-झिम्बाब्वेलोकेश राहुलविराट कोहलीरिषभ पंत
Open in App