T20 World Cup, IND vs AUS Warm-Up match Live : Hardik Pandya ला रोहित शर्माचा फुल्ल सपोर्ट; म्हणाला, गरज पडल्यास सहावा गोलंदाज म्हणून मी गोलंदाजी करीन!

Australia won the toss and decided to bat first against India - पहिल्या सराव सामन्यात इंग्लंडला पराभूत केल्यानंतर भारतीय संघ आज ऑस्ट्रेलियाचा सामना करणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2021 03:32 PM2021-10-20T15:32:22+5:302021-10-20T15:33:34+5:30

T20 World Cup, IND vs AUS Warm-Up match Live : Rohit Sharma confirms Hardik Pandya hasn't started bowling but hopefully he will start very soon | T20 World Cup, IND vs AUS Warm-Up match Live : Hardik Pandya ला रोहित शर्माचा फुल्ल सपोर्ट; म्हणाला, गरज पडल्यास सहावा गोलंदाज म्हणून मी गोलंदाजी करीन!

T20 World Cup, IND vs AUS Warm-Up match Live : Hardik Pandya ला रोहित शर्माचा फुल्ल सपोर्ट; म्हणाला, गरज पडल्यास सहावा गोलंदाज म्हणून मी गोलंदाजी करीन!

Next

T20 World Cup, India vs Australia Warm-Up match Live : Australia won the toss and decided to bat first against India - पहिल्या सराव सामन्यात इंग्लंडला पराभूत केल्यानंतर भारतीय संघ आज ऑस्ट्रेलियाचा सामना करणार आहे. इंग्लंडविरुद्ध विश्रांती देण्यात आलेला रोहित शर्मा ( Rohit Sharma) कांगारूंविरुद्धच्या सामन्यात कर्णधार म्हणून परतला आहे. ऑस्ट्रेलियानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. यावेळी रोहितला हार्दिक पांड्याच्या ( Hardik Pandya) गोलंदाजी करण्याबाबत विचारण्यात आले आणि त्यानं Mumbai Indians च्या सहकाऱ्याला फुल्ल सपोर्ट दिला. 

आजच्या सामन्यात टीम इंडियानं विराट कोहली. जसप्रीत बुरमाह आणि मोहम्मद शमी यांना विश्रांती देण्याचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानचा २४ ऑक्टोबरला सामना करण्यापूर्वी अंतिम ११ ठरवण्यासाठीची ही शेवटची संधी आहे. त्यामुळे संघात बदल करण्यात आले आहेत. पण, हार्दिक पांड्याची तंदुरुस्ती हा चर्चेचा विषय ठरतोय. आज रोहितनं त्याबाबत स्पष्टिकरण दिले. 

तो म्हणाला,''हार्दिक पांड्या गंभीर दुखापतीतून सावरून मैदानावर उतरला आहे आणि त्याला पूर्णपणे तंदुरूस्त होण्यासाठी पुरेसा वेळ द्यायला हवा. तो आजही गोलंदाजी करण्यासाठी फिट नाही, परंतु तो लवकरच गोलंदाजी करेल.  मी, विराट कोहली, सूर्यकुमार आमचा गरज पडल्यास सहावा गोलंदाज म्हणून वापर होऊ शकतो ( मोठ्यानं हसला). पण, आमच्याकडे ५ तुल्यबळ गोलंदाज आहेत. बघु पुढे काय होतं ते.''


भारतीय संघ - लोकेश राहुल, रोहित शर्मा, इशान किशन, रिषभ पंत, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, आर अश्विन, राहुल चहर, भुवनेश्वर कुमार, शार्दूल ठाकूर, वरुण चक्रवर्थी. ( IND (11 batting, 11 fielding): KL Rahul, Rohit Sharma (c), Ishan Kishan, Rishabh Pant (w), Suryakumar Yadav, Hardik Pandya, Ravindra Jadeja, Ravichandran Ashwin, Rahul Chahar, Bhuvneshwar Kumar, Shardul Thakur, Varun Chakaravarthy.)

ऑस्ट्रेलियाचा संघ  -  डेव्हिड वॉर्नर, आरोन फिंच, मिचेल मार्श, स्टीव्ह स्मिथ, मार्कस स्टॉयनिस, मॅथ्यू वेड, अॅश्टन अॅगर, मिचेल स्टार्क, जोश इंग्लिस, केन रिचर्डसन, अॅडम झम्पा, मिचेल स्वेप्सन, ग्लेन मॅक्सवेल, पॅट कमिन्स ( #AUS (11 batting, 11 fielding): David Warner, Aaron Finch (c), Mitchell Marsh, Steven Smith, Marcus Stoinis, Matthew Wade (w), Ashton Agar, Mitchell Starc, Josh Inglis, Kane Richardson, Adam Zampa, Mitchell Swepson, Glenn Maxwell, Pat Cummins.) 

Web Title: T20 World Cup, IND vs AUS Warm-Up match Live : Rohit Sharma confirms Hardik Pandya hasn't started bowling but hopefully he will start very soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app