Join us  

T20 World Cup, ENG vs SL : अखेरच्या चेंडूवर षटकार, जॉस बटलरनं पूर्ण केलं शतक, १२ चेंडूंत कुटल्या ६० धावा; श्रीलंकेचा धुव्वा उडवला 

T20 World Cup, England vs Sri Lanka : इंग्लंडलाही आजच्या सामन्यात त्याच परिस्थितीचा सामना करावा लागला, परंतु त्यांनी श्रीलंकेच्या गोलंदाजांना सडेतोड उत्तर दिले.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 01, 2021 9:20 PM

Open in App

T20 World Cup, England vs Sri Lanka : ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत रविवारी झालेल्या टीम इंडियाच्या पराभवाच्या सदम्यातून काही केल्या बाहेर पडता येत नाही. इशान किशन, लोकेश राहुल, रोहित शर्मा हे आघाडीचे फलंदाज झटपट माघारी परतल्यानंतर टीम इंडियाची गाडी घसरली ती घसरलीच. पण, इंग्लंडलाही आजच्या सामन्यात त्याच परिस्थितीचा सामना करावा लागला, परंतु त्यांनी श्रीलंकेच्या गोलंदाजांना सडेतोड उत्तर दिले. नाणेफेकीचा कौल विरोधात गेल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या इंग्लंडची सुरुवातही  खराब झाली. मात्र, ते खचले नाही आणि जोरदार मुसंडी मारून श्रीलंकेसमोर तगडे आव्हान उभे केले.

जेसन रॉय व जॉस बटलर ही जोडी खेळपट्टीवर उतरली आणि श्रीलंकेनं त्यांचा फॉर्मात असलेला गोलंदाज मैदानावर उतरवला. वनिंदू हसरंगानं दुसऱ्याच षटकात इंग्लंडला धक्का दिला. रॉय ( ९) त्रिफळाचीत झाला. डावखुऱ्या डेव्हिड मलानला प्रमोशन दिलं गेलं, परंतु दुष्मंथा चमिरानं त्याला ६ धावांवर बाद केलं. जॉनी बेअरस्टो भोपळ्यावर हसरंगाच्या गोलंदाजीवर पायचीत झाला. श्रीलंकेनं त्याच्यासाठी घेतलेला DRS यशस्वी ठरला. इंग्लंडचे ३ फलंदाज ३५ धावांवर माघारी परतले होते. खेळपट्टीवर फॉर्माशी झगडणारा इयॉन मॉर्गन व  तुफान फॉर्मात असलेला बटलर होते.

मॉर्गननं संयमी खेळ करताना बटलरसह चौथ्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. खेळपट्टीवर तग धरल्यानंतर या दोघांनी फटकेबाजीला सुरुवात केली. मॉर्गननं ३६ चेंडूंत १ चौकार व ३ षटकार खेचून ४० धावा करताना आत्मविश्वास कमावला. हसरंगानं या सामन्यातील तिसरी विकेट घेतली. त्यानं चार षटकांत २१ धावा दिल्या. बटलर तुफान फटकेबाजी करत होता आणि अखेरच्या षटकात त्यानं शतक पूर्ण करून संघाला संघाला ४ बाद १६३ धावांचा पल्ला गाठून दिला. बटलरनं अखेरच्या चेंडूवर षटकार खेचून ट्वेंटी-२० तील पहिले शतक झळकावलं. त्यानं ६७ चेंडूंत नाबाद १०१ धावा केल्या आणि त्यात ६ चौकार व ६ षटकारांचा समावेश होता. 

ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील शतकवीरख्रिस गेल ( २), सुरेश रैना, महेला जयवर्धने, ब्रेंडन मॅक्युलम, अॅलेक्स हेल्स, अहमद शेहजाद, तमिम इक्बाल, जॉस बटलर  

टॅग्स :ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२१जोस बटलरइंग्लंडश्रीलंका
Open in App