दक्षिण आफ्रिका Super 8 मध्ये पहिला सामना जिंकला, पण अमेरिकेने शेवटपर्यंत लढा दिला

कागिसो रबाडाने १९व्या षटकात महत्त्वाची विकेट घेऊन सामना फिरवला. 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2024 11:19 PM2024-06-19T23:19:30+5:302024-06-19T23:20:32+5:30

whatsapp join usJoin us
T20 World Cup 2024, USA vs SA Live : South Africa won the first match in the Super 8, but America fought till the end | दक्षिण आफ्रिका Super 8 मध्ये पहिला सामना जिंकला, पण अमेरिकेने शेवटपर्यंत लढा दिला

दक्षिण आफ्रिका Super 8 मध्ये पहिला सामना जिंकला, पण अमेरिकेने शेवटपर्यंत लढा दिला

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

T20 World Cup 2024, USA vs SA Live : दक्षिण आफ्रिकेने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील विजयी मालिका कायम राखताना Super 8 मध्ये अमेरिकेवर विजय मिळवला. क्विंटन डी कॉकला गवसलेला सूर ही आफ्रीकेसाठी मोठी सकारात्मक बाब ठरली. अमेरिकेकडून कडवी टक्कर पाहायला मिळाली, परंतु आफ्रिकेने आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या अनुभवाच्या जोरावर हा सामना जिंकला. कागिसो रबाडाने १९व्या षटकात महत्त्वाची विकेट घेऊन सामना फिरवला. अमेरिकेचा एड्रियन गौस ४७ चेंडूंत ५ चौकार व तितकेच षटकार खेचून ८० धावांवर नाबाद राहिला. 


साखळी गटात दमदार कामगिरी करून सर्वांना आश्चर्यचकित करणाऱ्या अमेरिकेने Super 8 मध्ये   नाणेफेक जिंकून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. सौरव नेत्रावळकरने ( २-२१) पुन्हा अप्रतिम स्पेल टाकली. क्विंटन डी कॉक आणि एडन मार्करम मैदानावर उभे राहिले. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ११० धावांची भागीदारी केली. क्विंटनने ४० चेंडूंत ७ चौकार व ५ षटकारांसह ७४ धावा केल्या. हरमीत सिंगने ( २-२४) सलग दोन चेंडूंवर विकेट घेतल्या. मार्करम ३२ चेंडूंत ४ चौकार व १ षटकारासह ४६ धावांवर बाद झाला. हेनरिच क्लासेन व त्रिस्तान स्तब्स यांनी पाचव्या विकेटसाठी झटपट पन्नास धावा जोडल्या आणि संघाला ४ बाद १९४ धावांपर्यंत पोहोचवले. क्लासेन २२ चेंडूंत ३६ धावांवर, तर स्तब्स २० धावांवर नाबाद राहिला. 


स्टीव्हन टेलरने आक्रमक सुरुवात करून देताना १४ चेंडूंत २४ धावा चोपल्या, परंतु चौथ्या षटकात कागिसो रबाडाने त्याला बाद केले. रबाडने दुसरी विकेट मिळवताना नितीश कुमारला ( ८) बाद करून अमेरिकेला ५३ धावांवर दुसरा धक्का दिला. केशव महाराजने त्याच्या पहिल्याच षटकात आरोन जोन्सला भोपळ्यावर बाद करून आफ्रिकेला मोठे यश मिळवून दिले. कोरी अँडरसन ( १२) आफ्रिकेची डोकेदुखी वाढवेल असे वाटलेले, परंतु एनरिच नॉर्खियाने त्याचा त्रिफळा उडवला. तब्रेझ शम्सीने अमेरिकेला पाचवा धक्का देताना शयान जहांगिरला ( ३) बाद केले. एड्रियन गौसने १५व्या षटकात नॉर्खियाला १७ धावा कुटून ३३ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले.


अमेरिकेला ३० चेंडूंत ७३ धावांची गरज असताना गौस व हरमीत सिंग यांच्या अर्धशतकीय भागीदारीने आशेचा किरण कायम ठेवला होता. या दोघांनी १८ चेंडूंत ५० धावा असा सामना जवळ आणला होता. केशव महाराज, एनरिच नॉर्खिया व तब्रेझ शम्सी यांनी प्रत्येकी १ विकेट घेतल्या.     शम्सीने टाकलेल्या १८व्या षटकात गौस व हरमीत यांनी २१ धावा चोपून मॅच १२ चेंडूंत २८ अशी आणली. रबाडाने १९व्या षटकात ४३ चेंडूंतील ९१ धावांची भागीदारी तोडली. हरमीत २२ चेंडूंत २ चौकार व ३ षटकारांसह ३८ धावांवर झेलबाद झाला. रबाडाने त्या षटकात २ धावा देत आपली स्पेल ४-०-१८-३ अशी संपवली. अमेरिकेला शेवटच्या ६ चेंडूंत २६ धावा हव्या होत्या आणि सेट फलंदाज गौस स्ट्राईकवर होता. पण, अमेरिकेला ७ धावाच करता आल्या आणि त्यांना ६ बाद १७६ धावांवर समाधान मानावे लागले. आफ्रिकेने १८ धावांनी सामना जिंकला. 

Web Title: T20 World Cup 2024, USA vs SA Live : South Africa won the first match in the Super 8, but America fought till the end

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.