IND vs AUS Live : टॉसचा 'बॉस' ऑस्ट्रेलिया ठरला! रोहित शर्माने प्लेइंग इलेव्हनबाबत बघा काय निर्णय घेतला

T20 World Cup 2024 IND vs AUS Live Marathi : इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांनी ग्रुप २ मधून ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश निश्चित केला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2024 07:32 PM2024-06-24T19:32:38+5:302024-06-24T19:37:05+5:30

whatsapp join usJoin us
T20 World Cup 2024 IND vs AUS Live Marathi : Australia win the toss and bowl, team india playing with same playing XI | IND vs AUS Live : टॉसचा 'बॉस' ऑस्ट्रेलिया ठरला! रोहित शर्माने प्लेइंग इलेव्हनबाबत बघा काय निर्णय घेतला

IND vs AUS Live : टॉसचा 'बॉस' ऑस्ट्रेलिया ठरला! रोहित शर्माने प्लेइंग इलेव्हनबाबत बघा काय निर्णय घेतला

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

T20 World Cup 2024 IND vs AUS Live Marathi : इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांनी ग्रुप २ मधून ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश निश्चित केला आहे. ग्रुप १ मध्ये अजूनही टीम इंडिया, ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान व बांगलादेश हे उपांत्य फेरीच्या शर्यतीत आहेत. भारतीय संघाचे ४ गुण असले तरी त्यांचे स्थान आज ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या लढतीतील निकालानंतर निश्चित होईल. अफगाणिस्तानकडून पराभूत झाल्यामुळे ऑस्ट्रेलिया अडचणीत आली आहे. त्यामुळे भारताविरुद्ध विजय मिळवून ते शर्यतीत राहण्यासाठी प्रयत्नशील आहेत, परंतु २०२३च्या वन डे वर्ल्ड कप फायनलमध्ये झालेल्या पराभवाची परतफेड करण्याची हिच संधी असल्याचे मत भारतीय चाहत्यांमध्ये आहे. त्यामुळे टीम इंडिया विजय मिळवून ऑस्ट्रेलियाचे पॅकअप करण्यासाठी प्रयत्नशील नक्की असतील.  

सेंट ल्युसिया येथे होणाऱ्या या लढतीवर पावसाचे सावट व्यक्त केले जात आहे. काल रात्रभर येथे संततधार सुरू असल्याचे वृत्त आहे आणि आता पावसाने विश्रांती जरी घेतली असली तर पावसाचे पुनरागमन होण्याचा अंदाज आहे. सामन्यापूर्वी विराट कोहलीने संपूर्ण टीमला मार्गदर्शन केल्याचे चित्र पाहायला मिळाले. खेळाडूंनी केलेल्या वर्तुळात विराट उभं राहून त्यांना आजच्या सामन्याविषयी महत्त्वाच्या टिप्स देत होता. ऑस्ट्रेलियाविरुद्ध ट्वेंटी-२०त विराटने सर्वाधिक ७९४ धावा केल्या आहेत आणि त्यानंतर  जॉस बटलरचा ( ५८४) नंबर येतो जो दोनशे धावांनी मागे आहे.  


 

ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारतीय संघाने प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताच बदल न करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे रवींद्र जडेजा, अक्षर पटेल व कुलदीप यादव असे तीन फिरकीपटू व जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग व हार्दिक पांड्या असे तीन जलदगती गोलंदाजांचे पर्याय संघात आहेत. रोहित शर्मा, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, शिवम दुबे यांच्यावर फलंदाजीची जबाबदारी असेल. 

Web Title: T20 World Cup 2024 IND vs AUS Live Marathi : Australia win the toss and bowl, team india playing with same playing XI

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.