ख्रिस जॉर्डनने घेतली हॅटट्रिक! इंग्लंडच्या गोलंदाजांनी ६ चेंडूत घेतल्या ५ विकेट्स, अमेरिका ऑल आऊट

इंग्लंडने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील सुपर ८च्या त्यांच्या शेवटच्या लढतीत अमेरिकेला स्वस्तात रोखले.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2024 09:36 PM2024-06-23T21:36:41+5:302024-06-23T21:36:54+5:30

whatsapp join usJoin us
T20 World Cup 2024 ENG vs UAE Live : HAT-TRICK FOR CHRIS JORDAN, America all out on 115 runs  | ख्रिस जॉर्डनने घेतली हॅटट्रिक! इंग्लंडच्या गोलंदाजांनी ६ चेंडूत घेतल्या ५ विकेट्स, अमेरिका ऑल आऊट

ख्रिस जॉर्डनने घेतली हॅटट्रिक! इंग्लंडच्या गोलंदाजांनी ६ चेंडूत घेतल्या ५ विकेट्स, अमेरिका ऑल आऊट

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

T20 World Cup 2024 ENG vs UAE Live : इंग्लंडने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील सुपर ८च्या त्यांच्या शेवटच्या लढतीत अमेरिकेला स्वस्तात रोखले. आदिल राशिदने फिरकीचा चांगला मारा केला. ग्रुप २ मध्ये इंग्लंड व वेस्ट इंडिज प्रत्येकी २ गुणांसह उपांत्य फेरीच्या शर्यतीत आहेत. दक्षिण आफ्रिका ४ गुणांसह आघाडीवर असली तरी त्यांचे उपांत्य फेरीचे स्थान निश्चित नाही. त्यामुळे आजच्या निकालावर पुढील बरेच गणित अवलंबून आहे. इंग्लंडचा गोलंदाज ख्रिस जॉर्डनने ( HAT-TRICK FOR CHRIS JORDAN) हॅटट्रिक घेतली. 


गतविजेत्या इंग्लंडने सुपर ८ मध्ये अखेरच्या क्षणाला एन्ट्री घेतली आणि त्यानंतर त्यांच्याकडून चांगला खेळ पाहायला मिळेल असे वाटले होते. पण, सुपर ८ च्या दुसऱ्या लढतीत दक्षिण आफ्रिकेकडून त्यांना हार पत्करावी लागली आणि उपांत्य फेरीत थेट प्रवेश मिळवण्याची त्यांची संधी इतरांवर अवलंबून राहिली. इंग्लंडसमोर आज अमेरिकेचे आव्हान आहे आणि हा सामना जिंकून उपांत्य फेरीच्या शर्यतीत कायम राहण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. पण, त्यांना विजयासोबतच नेट रन रेटही प्रचंड सुधरावा लागणार आहे. ग्रुप २ मध्ये सध्या दक्षिण आफ्रिका ४ गुण व ०.६२५ नेट रन रेटसह अव्वल क्रमांकावर आहे. वेस्ट इंडिज ( १.८१४) आणि इंग्लंड ( ०.४१२) हे प्रत्येकी २ गुणांसह उपांत्य फेरीच्या शर्यतीत आहेत.


इंग्लंडने नाणेफेक जिंकून अमेरिकेविरुद्ध प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. अमेरिकेचे सलामीवीर स्टीव्हन टेलर ( १२ ) व एँड्रीएस गौस ( ८) यांना ४३ धावांवर इंग्लंडच्या गोलंदाजांनी माघारी पाठवले. नितीश कुमार ( ३०) आणि कर्णधार आरोन जॉन्स ( १०) यांना आदिल राशिदने त्रिफळाचीत केले. राशिदने ४-०-१३-२ अशी अप्रतिम स्पेल टाकली. मिलिंद कुमार ( ४) लिएम लिव्हिंगस्टोनच्या गोलंदाजीवर बाद झाल्याने अमेरिकेची अवस्था ५ बाद ८८ अशी झाली. हरमीत सिंग ( २१) याने चांगली फटकेबाजी करून कोरी अँडरसनला ( १९) साथ दिली.  


ख्रिस जॉर्डनने १९व्या षटकात हॅटट्रिक घेताना अमेरिकेचा संपूर्ण संघ ११५ धावांत तंबूत पाठवला. जॉर्डनने २.५-०-१०-४ अशी स्पेल टाकली. सॅम कुरनने दोन विकेट्स घेतल्या. अमेरिकेने ६ चेंडूंत ५ विकेट्स गमावल्या. 

Web Title: T20 World Cup 2024 ENG vs UAE Live : HAT-TRICK FOR CHRIS JORDAN, America all out on 115 runs 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.