दक्षिण आफ्रिका Semi Final च्या उंबरठ्यावर! गतविजेत्या इंग्लंडचा विजयाचा घास हिसकावला 

गतविजेत्या इंग्लंडला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या सुपर ८ गटातील दुसऱ्या सामन्यात विजयाने थोडक्यात हुलकावणी दिली.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2024 11:30 PM2024-06-21T23:30:18+5:302024-06-21T23:31:31+5:30

whatsapp join usJoin us
T20 World Cup 2024 ENG vs SA Live Marathi :South Africa on the verge of Semi Final! Defending champion England lose thriling match | दक्षिण आफ्रिका Semi Final च्या उंबरठ्यावर! गतविजेत्या इंग्लंडचा विजयाचा घास हिसकावला 

दक्षिण आफ्रिका Semi Final च्या उंबरठ्यावर! गतविजेत्या इंग्लंडचा विजयाचा घास हिसकावला 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

T20 World Cup 2024 ENG vs SA Live Marathi : गतविजेत्या इंग्लंडला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या सुपर ८ गटातील दुसऱ्या सामन्यात विजयाने थोडक्यात हुलकावणी दिली. २०व्या षटकात एडन मार्करमने घेतलेला परतीला झेल सामन्याला कटालणी देणारा ठरला. इंग्लंडला विजयासाठी १८ चेंडूंत २५ धावांची गरज असताना कागिसो रबाडाने सेट फलंदाज लिएम लिव्हिंगस्टोनला माघारी पाठवून हॅरी ब्रूकसोबतची ७८ धावांची भागीदारी तोडली. त्यानंतर मार्को यानसेन व एनरिच नॉर्खियाने अखेरच्या दोन षटकांत सामना खेचून आणला.

 
क्विंटन डी कॉकने ३८ चेंडूंत ४ चौकार व ४ षटकारासह ६५  धावा केल्या. क्विंटन व रिझा हेंड्रिक्स ( १९) यांनी पहिल्या विकेटसाठी ९.५ षटकांत ८६ धावा जोडल्या. सहा धावानंतर क्विंटन माघारी परतला आणि इंग्लंडच्या गोलंदाजांना पुनरागमन करण्याची संधी मिळाली. हेनरिच क्लासेन ( ८) दुर्देवीरित्या रन आऊट झाला. कर्णधार एडन मार्करम ( १) हाही आदिल राशीदच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला. डेव्हिड मिलर खेळपट्टीवर उभा राहिला आणि त्याने २८ चेंडूंत ४ चौकार व २ षटकारांसह ४३ धावांची खेळी केली. जोफ्रा आर्चरने २०व्या षटकात मिलरसह दोन धक्के दिले. त्रिस्तान स्तब्सने नाबाद १२ धावा केल्या आणि आफ्रिकेने ६ बाद १६३ धावांपर्यंत मजल मारली.


प्रत्युत्तरात कागिसो रबाडाने दुसऱ्या षटकात फिल सॉल्टला ( ११) माघारी पाठवले. रिझा हेंड्रिक्सने कव्हर्सवर अफलातून झेल घेतला. जॉनी बेअरस्टो १६ धावांवर केशव महाराजच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. महाराजने त्याच्या पुढच्या षटकात जॉस बटलरची ( १७) विकेट घेऊन इंग्लंडला मोठा धक्का दिला. ऑटनेल बार्टमनने ११व्या षटकात मोईन अलीला ( ९) माघारी पाठवले. हॅरी ब्रूक व लिएम लिव्हिंगस्टन यांनी इंग्लंडचा किल्ला लढवताना पाचव्या विकेटसाठी ३० चेंडूंत अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली. इंग्लंडला ३० चेंडूंत ५९ धावा हव्या होत्या.


१६व्या षटकात बार्टमनच्या गोलंदाजीवर लिव्हिंगस्टनने ४,४,६ २,१,४ अशी फटकेबाजी करून सामना १८ चेंडूंत २५ धावा असा आणला. ब्रूक व लिव्हिंगस्टन यांनी ४२ चेंडूंत ७८ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. १७व्या षटकात रबाडाने ही जोडी तोडली आणि लिव्हिंगस्ट १७ चेंडूंत ३ चौकार व २ षटकारांसह ३३ धावांवर माघारी परतला. रबाडाने त्या षटकात विकेटसह फक्त ४ धावा दिल्या. मार्को यानसेनने १९व्या षटकात ७ धावा दिल्या आणि आता इंग्लंडला ६ चेंडूंत १४ धावा करायच्या होत्या. सेट फलंदाज हॅरी ब्रूक स्ट्राईकवर होता. एनरिच नॉर्खियाने स्लोव्ह चेंडू फेकला आणि ब्रूकने मिड ऑनच्या दिशेने मारलेला चेंडू एडन मार्करमने उलट पळत सुटून अप्रतिमरित्या टिपला. ब्रूक ३७ चेंडू ७ चौकारांसह ५२ धावा केल्या. 


सॅम करनने तिसऱ्या चेंडूवर चौकार खेचून ३ चेंडूंत ९ धावा असा सामना जवळ आणला. चौथ्या चेंडूवर करनने धाव घेण्यास नकार दिला आणि २ चेंडूंत ९ धावा अशी मॅच आली. पाचव्या चेंडूवर १ धाव आल्याने सामना आफ्रिकेच्या खिशात आला. इंग्लंडला ६ बाद १५६ धावा करता आल्या आणि आफ्रिकेने ७ धावांनी सामना जिंकला. 

Web Title: T20 World Cup 2024 ENG vs SA Live Marathi :South Africa on the verge of Semi Final! Defending champion England lose thriling match

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.