Join us  

T20 World Cup 2021, Hardik Pandya : हार्दिक पांड्याला रिप्लेसमेंट म्हणून बीसीसीआय तीन खेळाडूंना UAEत थांबवून घेणार?; १५ ऑक्टोबरला मोठी घोषणा होणार

T20 World Cup 2021, Hardik Pandya : आगामी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी निवडलेल्या भारतीय संघातील खेळाडूंचा आयपीएल २०२१तील फॉर्म हा निवड समितीसाठी चिंतेचा विषय बनला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2021 4:16 PM

Open in App

T20 World Cup 2021, Hardik Pandya :  आगामी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी निवडलेल्या भारतीय संघातील खेळाडूंचा आयपीएल २०२१तील फॉर्म हा निवड समितीसाठी चिंतेचा विषय बनला आहे. सूर्यकुमार यादव आणि इशान किशन यांनी आयपीएलमधील अखेरच्या साखळी सामन्यांत फटकेबाजी करून फॉर्म मिळवलाय, परंतु हार्दिक पांड्या, राहुल चहर, भुवनेश्वर  कुमार यांचा फॉर्म अजूनही परतलेला नाही. त्यात हार्दिकची तंदुरुस्ती ही संघासाठी डोकेदुखी ठरताना दिसत आहे. अशात बीसीसीआयनं आयपीएलमध्ये जबरदस्त कामगिरी करणाऱ्या तीन खेळाडूंना UAEत थांबवण्याचा निर्णय घेतला असून त्यांच्याकडे हार्दिकची रिप्लेसमेंट म्हणून पाहिले जात आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाचा गोलंदाज हर्षल पटेल ( Harshal Patel), कोलकाता नाइट रायडर्सचा अष्टपैलू वेंकटेश अय्यर ( Venkatesh Iyer) आणि शिवम मावी ( Shivam Mavi) यांना थांबण्यास सांगितले आहे, असे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. हर्षलनं १५ सामन्यांत ३२ विकेट्स घेत पर्पल कॅप नावावर केली आहे. हर्षलनं या कामगिरीसह आयपीएलच्या एकाच पर्वात सर्वाधिक ३२ विकेट्स घेण्याचा ड्वेन ब्राव्हो याच्या विक्रमाशी बरोबरी केली. वेंकटेशही चांगल्या फॉर्मात आहे आणि शिवमही उत्तम कामगिरी करत  आहे. भारतीय संघ १५ ऑक्टोबरपर्यंत संघात बदल करू शकतो आणि बीसीसीआयनंही शुक्रवारपर्यंत वेट अँड वॉचची भूमिका घेतली आहे.

भारताचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील पहिला सामना  २४ ऑक्टोबरला होणार आहे आणि पहिला सामना खेळण्याच्या ७ दिवस आधी संघात बदल केला जाऊ शकतो. मुंबई इंडियन्सचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक यानं आयपीएलमध्ये गोलंदाजी केलेली नाही आणि फलंदाजीतही त्याला फार कमाल करता आली नाही. सनरायझर्स हैदराबादचा गोलंदाज उम्रान मलिक याची बीसीसीआयनं नेट बॉलर म्हणून निवड केली आहे. 

Cricbuzz नं दिलेल्या वृत्तानुसार हर्षल, वेंकटेश व शिवम यांनाही थांबण्यास सांगितले जाऊ शकते. भारतीय खेळाडू सध्या क्वारंटाईनमध्ये आहेत. MIच्या ताफ्यातील सहा खेळाडू टीम इंडियाच्या बायो बबलमध्ये दाखल झाले आहेत. सपोर्ट कालावधीच्या सात दिवस आधी संघात बदल करता येऊ शकतो. टीम इंडियाचा सपोर्ट कालावधी २३ तारखेला सुरू होणार आहे. त्यामुळे १५ ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपर्यंत संघात बदल करण्याची मुभा आहे,''असे बीसीसीआयच्या सूत्रांनी Cricbuzz ला सांगितले.  

''हार्दिकला वगळण्याचा निर्णय झालेला नाही. पण, तो झाल्यास शार्दूल ठाकूर आणि दीपक चहर यांचा मुख्य संघात समावेश केला जाऊ शकतो. त्यात निवड समिती हर्षल पटेलला यूएईत थांबण्यास  सांगू शकतात,''असेही सूत्रांनी सांगितले.   

टॅग्स :ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२१हार्दिक पांड्या
Open in App