Join us
Daily Top 2Weekly Top 5

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी २0 मालिका : सुरेश रैनाचे एका वर्षानंतर पुनरागमन

अनुभवी फलंदाज सुरेश रैना याला देशांतर्गत स्पर्धेत केलेल्या चांगल्या कामगिरीमुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध १८ फेब्रुवारीपासून सुरू होणा-या तीन सामन्यांच्या टी २0 मालिकेसाठी आज भारतीय संघात निवडण्यात आले.रैनाने फिटनेसविषयी असलेल्या समस्यांनादेखील दूर केले आणि विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील १६ सदस्यीय संघात स्थान मिळवण्यात तो यशस्वी ठरला.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2018 01:45 IST

Open in App

नवी दिल्ली : अनुभवी फलंदाज सुरेश रैना याला देशांतर्गत स्पर्धेत केलेल्या चांगल्या कामगिरीमुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध १८ फेब्रुवारीपासून सुरू होणा-या तीन सामन्यांच्या टी २0 मालिकेसाठी आज भारतीय संघात निवडण्यात आले.रैनाने फिटनेसविषयी असलेल्या समस्यांनादेखील दूर केले आणि विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील १६ सदस्यीय संघात स्थान मिळवण्यात तो यशस्वी ठरला.या डावखु-या फलंदाजाने याआधीचा आंतरराष्ट्रीय सामना इंग्लंडविरुद्ध फेब्रुवारी २0१७ मध्ये टी २0 सामन्याच्या रूपाने खेळला होता. त्यानंतर फिटनेसच्या कारणामुळे तो संघाबाहेर होता. बंधनकारक असणाºया यो यो टेस्टमध्ये यशस्वी झाल्याने त्याचे पुनरागमन शक्य झाले. याशिवाय रैनाने नुकत्याच झालेल्या सय्यद मुश्ताक अली करंडकाच्या सुपर लीगमध्येदेखील शानदार कामगिरी केली होती. त्याने उत्तर प्रदेशकडून एक शतक आणि दोन अर्धशतके झळकावली होती. भुवनेश्वर कुमार आणि शिखर धवन यांचेदेखील संघात पुनरागमन झाले आहे. या दोघांना श्रीलंकेविरुद्ध आधीच्या टी २0 मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली होती. या मालिकेत कोहलीलादेखील विश्रांती देण्यात आली होती. कोहलीच्या अनुपस्थितीत रोहित शर्माने भारतीय संघाचे नेतृत्व केले होते.दक्षिण आफ्रिकेत वनडे आणि टी २0 संघात जास्त प्रमाणात मुख्य खेळाडूंना स्थान देण्यात आले आहे. सिनिअर खेळाडूंच्या पुनरागमनामुळे दीपक हुड्डा, मोहंमद सिराज, वॉशिंग्टन सुंदर आणि बासील थम्पी यांच्यासारख्या खेळाडूंना संघाबाहेर जावे लागले. या चारही खेळाडूंचा श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत टी २0 संघात समावेश होता.वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकट याचे संघातील स्थान कायम आहे. तो श्रीलंकेविरुद्ध मालिकावीर किताबाचा मानकरी ठरला होता. डावखुरा फिरकी गोलंदाज अक्षर पटेल याचे संघात पुनरागमन झाले आहे. मुंबईचा वेगवान गोलंदाज शार्दूल ठाकूरला संघात ठेवण्यात आले आहे.दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी २0 मालिका १८ फेब्रुवारीपासून जोहान्सबर्ग येथे सुरू होणार आहे. याशिवाय अन्य सामने २४ फेब्रुवारी रोजी सेंच्युरियन आणि २४ फेब्रुवारी रोजी केपटाऊन येथे खेळवले जाणार आहेत.भारतीय टी २0 संघ पुढीलप्रमाणे :विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, के. एल. राहुल, सुरेश रैना, महेंद्र सिंह धोनी (यष्टीरक्षक), दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या, मनीष पांडे, अक्षर पटेल, यजुवेंद्र चहल, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, जयदेव उनाडकट आणि शार्दूल ठाकूर.

टॅग्स :क्रिकेटसुरेश रैना