शारजा, टी-10 लीग : नॉर्दन वॉरियर्स संघाने टी-10 लीगमध्ये शुक्रवारी पराक्रमच गाजवला. त्यांनी 10 षटकांत 183 धावा चोपून काढताना टी-20 मधील सर्वाधिक धावांचा विक्रम नावावर केला. याआधी बंगाल टायगर्सने वॉरियर्सविरुद्धच केलेली 130 धावांची खेळी ही या लीगमधील सर्वोत्तम खेळी होती.
नॉर्दन वॉरियर्सने पाच षटकांतच शतकी उंबरठा गाठला होता. निकोलस पुरणला दिलेले जीवदान पंजाबी लिजंड्स संघाला महागात पडले. त्याने 19 चेंडूंत तब्बल 9 षटकारच खेचले होते. त्याला दुसऱ्या बाजूने लेंडल सिमोन्सची साजेशी साथ मिळाली. सहाव्या षटकार सिमोन्स ( 36) बाद झाला. निकोलसने षटकारांची आतषबाजी कायम ठेवली. त्याची 25 चेंडूंत 77 धावांची वादळी खेळी 9 व्या षटकात संपुष्टात आली. या खेळीत त्याने 10 षटकार व दोन चौकार लगावले. आंद्र रसेल आणि रोव्हमन पॉवेल यांनी तुफान फटकेबाजी करताना शेवटच्या 11 चेंडूंत 53 धावा कुटल्या. दोघांनी वॉरियर्सला 183 धावांचा पल्ला गाठून दिला.
![]()