शारजा, टी-10 लीग : भारताचा माजी गोलंदाज आर पी सिंगने केलेल्या भेदक माऱ्यामुळे पखतून्स संघाने बंगाल टायगर्स संघाला 93 धावांमध्ये रोखले. आर पी सिंगने दोन षटकांमध्ये 14 धावा देत दोन बळी मिळवले.
बंगालच्या डावाची सुरुवात चांगली झाली होती. पण सलामीवीर जेसन रॉय बाद झाल्यावर मात्र बंगालचा डाव घसरत गेला. बंगालकडून शेरफेन रुदरफोर्डने 24 धावांची खेळी साकारली.