Join us  

T10 League: एका षटकांत 4,4,6,4,6... बंगाल टायगर्सने केली धावांची बरसात

लीगच्या दुसऱ्या दिवशी बंगाल टायगर्सच्या शेर्फन रुदरफोर्डने चाहत्यांना फटकेबाजीची चांगलीच मेजवानी दिली.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2018 5:50 PM

Open in App
ठळक मुद्देबंगाल टायगर्स आणि नॉर्दन वॉरियर्स यांच्यामध्ये दुसरा सामना सध्या सुरु आहे. या सामन्याच्या रोहन बोपण्णाच्या सहाव्या षटकात रुदरफोर्डने तीन चौकार आणि दोन षटकारांची अतिषबाजी केली. या षटकात रुदरफोर्डने तब्बल 24 धावांची लूट करत चाहत्यांना खूष केले.

शारजा, टी-10 लीग : धडाकेबाज फलंदाजीचा नजराणा टी-10 लीगच्या दुसऱ्या दिवशीही पाहायला मिळाला. लीगच्या दुसऱ्या दिवशी बंगाल टायगर्सच्या शेर्फन रुदरफोर्डने चाहत्यांना फटकेबाजीची चांगलीच मेजवानी दिली. 

बंगाल टायगर्स आणि नॉर्दन वॉरियर्स यांच्यामध्ये सामना सध्या सुरु आहे. या सामन्याच्या रोहन बोपाराच्या सहाव्या षटकात रुदरफोर्डने तीन चौकार आणि दोन षटकारांची अतिषबाजी केली. या षटकात रुदरफोर्डने तब्बल 24 धावांची लूट करत चाहत्यांना खूष केले. रुदरफोर्ड हा वेस्ट इंडिजचा तडफदार फलंदाज आहे. आतापर्यंत रुदरफोर्डने बऱ्याच लीगमध्ये दमदार फलंदाजी केली आहे. त्यामुळे रुदरफोर्डकडून बंगालच्या संघाला मोठ्या अपेक्षा आहेत.

 

टॅग्स :टी-10 लीग