Join us  

टी-२० विश्वचषकावर टांगती तलवार; पुढील आठवड्यात अधिकृत घोषणा होण्याची शक्यता

आयोजनासाठी १६ संघ आॅस्ट्रेलियात येणार आहेत. कोरोनामुळे मार्चपासून क्रिकेटचे सर्व आयोजन स्थगित करण्यात आले आहे. याच कारणांमुळे विश्वचषकाच्या आयोजनावर रद्दची टांगती तलवार आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2020 4:59 AM

Open in App

नवी दिल्ली : यंदा आॅक्टोबर महिन्यात आॅस्ट्रेलियात प्रथमच होणाऱ्या टी-२० विश्वचषकाच्या आयोजनावर टांगती तलवार आहे. एका अहवालानुसार हे आयोजन स्थगित करण्याच्या निर्णयावर पुढील आठवड्यात अधिकृत शिक्कामोर्तब होईल. आंतरराष्टÑीय क्रिकेट परिषदेने(आयसीसी) सातव्या पुरुष टी-२० विश्वचषकाचे आयोजन १८ आॅक्टोबर ते १५ नोव्हेंबर असे पाच आठवडे आयोजित करण्याचा मान सीएला दिला आहे.आयोजनासाठी १६ संघ आॅस्ट्रेलियात येणार आहेत. कोरोनामुळे मार्चपासून क्रिकेटचे सर्व आयोजन स्थगित करण्यात आले आहे. याच कारणांमुळे विश्वचषकाच्या आयोजनावर रद्दची टांगती तलवार आहे. एका वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार टी-२० विश्वचषकाचे आयोजन रद्द होणे निश्चित आहे. याची अधिकृत घोषणा पुढील आठवड्यात होईल. आगामी काही दिवसात विविध बोर्ड आयसीसीच्या टेलिकॉन्फरन्समध्ये सहभागी होतील. त्यानंतर अधिकृत निर्णय होईल. १५ सप्टेंबरपर्यंत आॅस्ट्रेलियाच्या हवाई सीमा आंतरराष्टÑीय देशासाठी बंद असल्याने विमानप्रवासाची समस्या आहे. ही समस्या निकाली निघाली तरी येणाºया प्रत्येक व्यक्तीला दोन आठवडे क्वाारंटाईन व्हावे लागेल. तब्बल १८ संघातील खेळाडू आणि अधिकाऱ्यांना क्वारंटाईन करताना आॅस्ट्रेलियाला विविध समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. दुसरा पर्याय असा की आयसीसी बैठकीदरम्यान भारत आणि आॅस्ट्रेलिया बोर्डाला पर्याय देऊ शकेल. यानुसार २०२१ मध्ये भारताला आणि २०२२ मध्ये आॅस्ट्रेलियाला यजमानपदाचा मान मिळू शकतो. या अदलाबदलीवर चर्चा अपेक्षित आहे. (वृत्तसंस्था)द्विपक्षीय मालिका होईल- रॉबर्ट्सदरम्यान, क्रिकेट आॅस्ट्रेलियाचे सीईओ केविन रॉबर्ट्स यांनी आयसीसी टी-२० विश्वचषक आयोजनाबद्दल स्थिती स्पष्ट नसल्याचे सांगितले. ‘न्यूज कॉर्प’शी बोलताना ते म्हणाले, ‘आमची स्थिती अद्याप स्पष्ट नाही, परिस्थिती सुधारल्यास आयोजनाचा विचार करता येईल. भारतासोबत होणाºया चार कसोटी सामन्यांच्या द्विपक्षीय मालिकेबाबत मात्र त्यांनी विश्वास व्यक्त केला. ही मालिका होईल, याची ९० टक्के खात्री असल्याचे त्यांनी सांगितले. आमच्याकडे प्रेक्षक राहतील का, हे सांगू शकत नाही, मात्र भारताचे आदरातिथ्य करण्यास आम्ही सज्ज असू, इतके मी सांगू शकतो, असे वक्तव्य रॉबर्ट्स यांनी केले.आयपीएल आयोजनाला बळ मिळणारटी-२० विश्वचषक स्थगित झाल्यास बीसीसीआय आयपीएल आयोजनाची तयारी सुरू करू शकेल. अलीकडे सीईओ राहुल जोहरी यांनी तसे संकेत दिले होते. विश्वचषक होणार नसेल तर भारत सरकारच्या दिशानिर्देशानुसार सप्टेंबर ते नोव्हेेंबर या कालावधीत आयपीएलच्या १३ व्या सत्राचे आयोजन होऊ शकते. मान्सूननंतरच स्पर्धात्मक क्रिकेट सुरू होऊ शकेल, असे जोहरी यांचे मत होते. आयपीएलमध्ये विदेशी खेळाडू सहभागी होऊ शकतील, असे आश्वासन देत मान्सूननंतर खेळाडूंना १४ दिवस क्वारंटाईन करण्यात थोड्या अडचणी येऊ शकतात, अशी त्यांनी चिंता व्यक्त केली होती.

टॅग्स :टी-20 क्रिकेट