Join us  

ना मुंबई, ना CSK; IPL 2024 जेतेपदासाठी सुरेश रैनाचा 'या' संघाला फूल सपोर्ट

इंडियन प्रीमिअर लीग २०२४ ( IPL 2024) ला शुक्रवारपासून सुरुवात होतेय आणि चेन्नई सुपर किंग्स जेतेपद कायम राखण्याच्या निर्धाराने ...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2024 12:21 PM

Open in App

इंडियन प्रीमिअर लीग २०२४ ( IPL 2024) ला शुक्रवारपासून सुरुवात होतेय आणि चेन्नई सुपर किंग्स जेतेपद कायम राखण्याच्या निर्धाराने उद्घाटनीय लढतीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( CSK vs RCB) शी भिडणार आहे. याहीवेळेस जेतेपदाच्या दावेदारांमध्ये चेन्नई सुपर किंग्ससह मुंबई इंडियन्सनही आहे. पण, यावेळी माजी खेळाडू सुरेश रैना  ( Suresh Raina) याने ना MI, ना CSK तर दुसराच संघ जेतेपद जिंकेल असे भाकित केले आहे. 

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने पाच आयपीएल जेतेपद पटकावली आहेत आणि यंदा हा संघ  हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे. महेंद्रसिंग धोनीनेही चेन्नईला पाच जेतेपद जिंकून दिली आहेत आणि आयपीएलच्या त्याच्या शेवटच्या पर्वात आणखी एक जेतेपद पटकावण्याचे त्याचे लक्ष्य असेल. पण, यावेळी विराट कोहलीचा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( RCB ) जेतेपदाचा प्रबळ दावेदार असेल, असा दावा सुरेश रैनाने केला आहे.

Mr IPL रैनाने २०५ सामन्यांत ५५२८ धावा केल्या आहेत. ३७ वर्षीय रैनाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे आणि त्यात तो म्हणाला, मला वाटतं RCB ने जिंकायला हवे. यासाठी नव्हे की त्यांना एकदाही जेतेपद पटकावता आलेले नाही, तर मी त्यांच्याविरुद्ध जेवढे सामने खेळलो त्यात ते विजयाचे हकदार होते. त्यामुळे त्यांनी यावेळी चषक उंचवायला हवा.

मागच्या वर्षी आरसीबीला प्लेऑफ साठी पात्र ठरता आले नव्हते, परंतु यावर्षी ते १७ वर्षांचा जेतेपदाचा दुष्काळ संपवण्याच्या प्रयत्नात असतील. मागील १६ पर्वात त्यांना २००९, २०११ व २०१६ अशी तीन पर्वात अंतिम फेरीत पोहोचता आले होते. २००९ मध्ये एडम गिलख्रिस्टच्या डेक्कन चार्जर्सने त्यांना ६ धावांनी हार मानण्यास भाग पाडले होते. २०११ मध्ये चेन्नई सुपर किंग्सने ५८ धावांनी विजय मिळवून जेतेपद नावावर केले होते, तर २०१६मध्ये सनरायझर्स हैदराबादने डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्वाखाली फायनलमध्ये आरसीबीला नमवले होते.  

टॅग्स :आयपीएल २०२४चेन्नई सुपर किंग्ससुरेश रैनारॉयल चॅलेंजर्स बेंगलोर