Join us  

सुरेश रैना अडचणीत सापडला; TNPLच्या लाईव्ह सामन्यात केलेल्या विधानामुळे 'जातीवादी'चा वाद सुरू झाला!

भारताचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैना यानं तामिळनाडू प्रीमिअर लीगच्या लाईव्स सामन्यादरम्यान चेन्नईच्या संस्कृतीचे कौतुक केले, पण..

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2021 7:19 PM

Open in App

भारताचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैना यानं तामिळनाडू प्रीमिअर लीग ( TNPL)च्या लाईव्स सामन्यादरम्यान चेन्नईच्या संस्कृतीचे कौतुक करताना मी स्वतः ब्राह्मण असल्याचे विधान केलं. उत्तर प्रदेशच्या या खेळाडूच्या विधानामुळे सोशल मीडियावर त्याच्यावर 'जातीवादी' असल्याचा वाद सुरू झाला आहे.  

तामिळनाडू प्रीमिअर लीगचा पहिला सामना लिका कोवाई किंग्स आणि सालेम स्पार्टन्स यांच्यात खेळवला गेला. या सामन्यादरम्यान समालोचन करताना रैनाला चेन्नईच्या संस्कृतीबद्दल विचारण्यात आले. रैना अनेक वर्ष इंडियन प्रीमिअर लीगमधील चेन्नई सुपर किंग्सचा सदस्य आहे.  

त्यावेळी रैना म्हणाला की,''मला वाटत, मीही ब्राह्मिण आहे. २००४पासून मी चेन्नईत खेळतोय. मला येथील संस्कृती आवडते. मला माझे सहकारीही आवडतात. अनिरुद्ध श्रीकांत, सुब्रमणीयम बद्रीनाथ, लक्ष्मीपथी बालाजी यांच्यासोबत मी खेळलोय. चेन्नईकडून तुम्हाला काही चांगलं शिकायला हवं. चेन्नई सुपर किंग्सचा सदस्य होण्यास मिळाल्याने, मी स्वतःला नशीबवान समजतो. आशा करतो आणखी काही सामने येथे खेळायला मिळतील.''   ऑगस्ट २०२०त ३४ वर्षीय रैनानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलीय.   

टॅग्स :सुरेश रैनाचेन्नई सुपर किंग्स