Join us  

विजयाचे खाते उघडण्यास सनरायजर्स प्रयत्नशील, दिल्लीविरुद्ध लढत

हैदराबाद विजयाची चव न चाखलेला एकमेव संघ

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2020 12:59 AM

Open in App

अबुधाबी : सलग दोन विजयामुळे आत्मविश्वास उंचावलेला दिल्ली कॅपिटल्स संघ इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) मंगळवारी सनरायजर्स हैदराबादविरुद्धच्या लढतीत विजयी लय कायम राखण्यास उत्सुक आहेत. डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्वाखालील सनरायजर्स हैदराबाद संघ स्पर्धेत विजयाची चव न चाखलेला एकमेव संघ आहे. हैदराबाद संघ विजयासह पुनरागमन करण्यास प्रयत्नशील आहे.

मोसमाच्या सलामी लढतीत जॉनी बेयरस्टॉ (६१) व मनीष पांडे (३४) यांच्या दमदार खेळीनंतर सुस्थितीत असलेला सनरायजर्स संघ १६४ धावांचे लक्ष्य गाठण्यात अपयशी ठरला. कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध दुसऱ्या लढतीतही संघाला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. या लढतीत रिद्धिमान साहाच्या संथ फलंदाजीवर टीका झाली. दिल्लीतर्फे फलंदाजीमध्ये पुन्हा एकदा अनुभवी शिखर धवन व युवा पृथ्वी शॉ यांच्यावर संघाला चांगली सुरुवात करून देण्याची जबाबदारी राहील. आॅस्ट्रेलियाचा अष्टपैलू मार्कस स्टोइनिसकडून फलंदाजीमध्ये उपयुक्त योगदान अपेक्षित आहे.आयपीएलमध्ये २०१६ ला जेतेपद पटकावणाºया सनरायजर्सने दुखापतग्रस्त मिशेल मार्शच्या स्थानी अफगाणिस्तानचा आॅफ स्पिनर मोहम्मद नबीला संधी दिली होती. नबीने फलंदाजी व गोलंदाजीमध्ये चांगले योगदान दिले. मात्र संघ या लढतीत नबीच्या स्थानी मधली फळी मजबूत करण्यासाठी केन विलियम्सनला अंतिम ११ मध्ये संधी देऊ शकते.

टॅग्स :आयपीएलदिल्ली कॅपिटल्स