Join us  

सनरायझर्स हैदराबादच्या 'सुंदर' संघाला मोठा झटका; दुखापतीमुळे स्टार खेळाडू IPL मधून बाहेर

ipl 2023 : सध्या आयपीएलच्या सोळाव्या हंगामाचा थरार रंगला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2023 12:31 PM

Open in App

sunrisers hyderabad captain । नवी दिल्ली : सध्या आयपीएलच्या सोळाव्या हंगामाचा थरार रंगला आहे. आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील निम्मा टप्पा पार पडला आहे. जवळपास सर्वच संघांनी सात ते आठ सामने खेळले असून गुणतालिकेत रस्सीखेच पाहायला मिळत आहे. आताच्या घडीला चेन्नई सुपर किंग्जचा (CSK) संघ १० गुणांसह अव्वल स्थानावर आहे. तर सनरायझर्स हैदराबादचा (SRH) संघ ४ गुणांसह क्रमवारीत तळाशी अर्थात नवव्या स्थानावर आहे. अशातच विजयासाठी संघर्ष करत असलेल्या सनरायझर्स हैदराबादला मोठा झटका बसला आहे. (Washington Sundar has been ruled out of the IPL 2023).

दरम्यान, वॉशिंग्टन सुंदरच्या रूपात हैदराबादच्या संघाला मोठा झटका बसला आहे. कारण दुखापतीमुळे तो आयपीएलमधून बाहेर झाला आहे. खरं तर सुंदर मागील काही कालावधीपासून हाताच्या दुखापतीमुळे त्रस्त होता. कागदावर तगडा वाटणाऱ्या हैदराबादच्या संघाने मैदानात काही प्रभावी कामगिरी केली नाही. संघाला केवळ दोन सामने जिंकण्यात यश आले आहे. एडन मार्करम, हॅरी ब्रूक, मार्को जान्सन, हेनरिक क्लासेन आणि भुवनेश्वर कुमार अशा स्टार खेळाडूंची फळी असताना देखील हैदराबादच्या संघाला चांगली कामगिरी करता आली नाही.

संघाच्या सलामी जोडीला येत असलेले अपयश संघाची डोकेदुखी वाढवत आहे. अलीकडेच हॅरी ब्रूकने शतक ठोकून चाहत्यांना जागे केले पण त्यालाही इतर सामन्यांमध्ये मोठी खेळी करता आलेली नाही. त्यामुळे सनरायझर्स हैदराबादला पात्रता फेरी गाठण्यासाठी उरलेल्या सामन्यात घवघवीत यश मिळवावे लागेल. कारण गुणतालिकेतील अव्वल स्थानाचा संघ आणि हैदराबादच्या संघात सहा गुणांचा फरक आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :आयपीएल २०२३सनरायझर्स हैदराबादवॉशिंग्टन सुंदरभुवनेश्वर कुमार
Open in App