T20 World Cup squad of India : सुनील गावस्कर यांनी निवडला भारताचा ट्वेंटी-२० संघ; सलामीसाठी सुचवली नवीन जोडी

संयुक्त अरब अमिराती येथे होणाऱ्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी टीम इंडियाची घोषणा आज होणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2021 10:38 AM2021-09-08T10:38:36+5:302021-09-08T10:39:24+5:30

whatsapp join usJoin us
Sunil Gavaskar's T20 World Cup squad of India : picks Virat Kohli and Rohit Sharma as the openers  | T20 World Cup squad of India : सुनील गावस्कर यांनी निवडला भारताचा ट्वेंटी-२० संघ; सलामीसाठी सुचवली नवीन जोडी

T20 World Cup squad of India : सुनील गावस्कर यांनी निवडला भारताचा ट्वेंटी-२० संघ; सलामीसाठी सुचवली नवीन जोडी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

टीम इंडियाच्या निवड समितीनं वर्ल्ड कपसाठीचा संघ निवडला आहे, फक्त मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री आणि कर्णधार विराट कोहली यांच्यासोबत अंतिम चर्चा करून त्याची घोषणा केली जाणार आहे. तत्पूर्वी, भारताचे महान फलंदाज सुनील गावस्कर यांनी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठीचे त्यांचे पसंतीचे शिलेदार जाहीर केले आहेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यांच्या संघातून शिखर धवन व श्रेयस अय्यर यांना स्थान मिळालेले नाही आणि त्यांनी सलामीसाठी नवीन पर्याय सांगितला आहे. ( former Indian batting legend Sunil Gavaskar picked his Indian squad for  T20 World Cup ) 

१७ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबर या कालावधीत ही स्पर्धा पार पडणार आहे. त्यासाठी आतापर्यंत न्यूझीलंड व पाकिस्तान या संघांनी आपापले शिलेदार जाहीर केले आहेत. आता उत्सुकता आहे ती टीम इंडियाच्या घोषणेची. भारतीय संघ २४ ऑक्टोबरला पाकिस्तान विरुद्ध सामना खेळून वर्ल्ड कप स्पर्धेत सुरुवात करणार आहे. गावस्कर यांच्या संघात दोन रवींद्र जडेजा व वॉशिंग्टन सुंदर हे दोन अष्टपैलू खेळाडू असणार आहे. गावस्कर यांनी त्यांच्या संघात पाच जलदगती गोलंदाजांचा समावेश केला आहे. त्यात जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, शार्दूल ठाकूर, दीपक चहर आणि मोहम्मद शमी यांचा समावेश आहे, तर फिरकीपटू म्हणून युझवेंद्र चहलची निवड केली आहे. गावस्कर यांनी विराट कोहली व रोहित शर्मा यांनी या स्पर्धेत सलामीला मैदानावर उतरावे असे मत मांडले आहे.   

असा आहे सुनील गावस्कर यांनी निवडलेला भारतीय संघ ( Sunil Gavaskar’s 15-man Indian squad for the 2021 T20 World Cup:) - रोहित शर्मा, विराट कोहली, लोकेश राहुल, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर ( तंदुरुस्तीवर अवलंबून), जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार, दीपक चहर, शार्दूल ठाकूर, युझवेंद्र चहल ( Rohit Sharma, Virat Kohli (c), KL Rahul, Suryakumar Yadav, Rishabh Pant (wk), Hardik Pandya, Krunal Pandya, Ravindra Jadeja, Washington Sundar (subject to fitness), Jasprit Bumrah, Mohammed Shami, Bhuvneshwar Kumar, Deepak Chahar, Shardul Thakur, Yuzvendra Chahal)

भारतीय संघाचे वेळापत्रक
२४ ऑक्टोबर - भारत वि. पाकिस्तान, दुबई, वेळ सायंकाळी ७.३० वाजता
३१ ऑक्टोबर -   भारत वि. न्यूझीलंड, दुबई, वेळ सायंकाळी ७.३० वाजता
३ नोव्हेंबर -    भारत वि, अफगाणिस्तान, अबु धाबी, वेळ सायंकाळी ७.३० वाजता
५ नोव्हेंबर - भारत वि. ब गटाती अव्वल, दुबई, वेळ सायंकाळी ७.३० वाजता
८ नोव्हेंबर - भारत वि. अ गटातील उपविजेता, दुबई, सायंकाळी ७.३० वाजता
उपांत्य फेरीचे सामने  -१० नोव्हेंबर आणि ११ नोव्हेंबर 
अंतिम सामना - १४ नोव्हेंबर

Web Title: Sunil Gavaskar's T20 World Cup squad of India : picks Virat Kohli and Rohit Sharma as the openers 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.