Join us  

IND vs WI Series : "चेतेश्वर पुजाराच्या मागे मिलियन फॉलोअर्स नाहीत, म्हणून त्याला बळीचा बकरा बनवलं" 

भारतीय संघाच्या वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी शुक्रवारी बीसीसीआयने वन डे व कसोटी संघ जाहीर केला...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2023 10:29 AM

Open in App

भारतीय संघाच्या वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी शुक्रवारी बीसीसीआयने वन डे व कसोटी संघ जाहीर केला... चेतेश्वर पुजारा ( Cheteshwar Pujara) याला कसोटी संघातून दिलेला डच्चू हा चर्चेचा विषय बनला आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमधील अपयशानंतर भारताच्या कसोटी संघात बदल पाहायला मिळेल हे निश्चित होते, परंतु पुजाराला काढल्याने महान फलंदाज सुनील गावस्कर ( Sunil Gavaskar) यांना संताप अनावर झालाय. दोन कसोटी सामन्यांच्या या मालिकेत तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी निवड समितीने यशस्वी जैस्वालची निवड केली आहे. 

विंडीज दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर; Ajinkya Rahane कडे उपकर्णधारपद, यशस्वी, ऋतुराजला संधी  

भारताचे माजी सलामीवीर गावस्कर यांनी या मालिकेत अनेक सिनियर खेळाडूंना विश्रांती देऊन युवकांना खेळवण्याची संधी निवड समितीकडे होते, असे मत व्यक्त केले. पण, निवड समितने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमधील निराशाजनक कामगिरी झालेल्या फलंदाजांपैकी कुणाला तरी वगळायचे म्हणून चेतेश्वर पुजाराला बळीचा बकरा बनवले, अशी टीका त्यांनी केली.  ''भारताच्या फलंदाजांच्या अपयशासाठी पुजाराला बळीचा बकरा का बनवलं गेलं? भारतीय क्रिकेटचा तो प्रामाणिक सेवक आहे, त्याने अविश्वसनीय खेळी केल्या आहेत, परंतु त्याच्यासाठी आवाज उठवायला मिलियन फॉलोअर्स नसल्याने  त्याला टार्गेट केले गेलेय. त्याला वगळले गेले? हे समजण्यापलिकडचे आहे,''असे गावस्कर म्हणाले.  

निवड  समितीला प्रश्न विचारले जाऊ शकत नाहीत, अशी खंत गावस्कर यांनी व्यक्त केली. कारण त्यांनी संघाची घोषणा  पत्रकार परिषदेत केली नाही. “त्याला वगळण्याचा आणि अपयशी ठरलेल्या इतरांना ठेवण्याचा निकष काय? मला माहित नाही कारण आजकाल निवड समितीच्या अध्यक्षांशी किंवा आपण हे प्रश्न कुठे विचारू शकता अशा कोणत्याही माध्यमांशी संवाद साधला जात नाही,” असे ते म्हणाले.  पुजारा हा एकमेव भारतीय फलंदाज नाही जो WTC Finalमध्ये मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला होता.

पुजारा दोन डावात १४ आणि २७ धावांवर बाद झाला. अजिंक्य रहाणे हा एकमेव खेळाडू होता ज्याने या सामन्यात दोन्ही डावांत ५० धावांचा टप्पा पार केला. “होय तो कौंटी क्रिकेट खेळत आहे, त्याला लाल चेंडू म्हणजे काय हे माहीत आहे. आजकाल खेळाडू ३९ किंवा ४० वर्षांचा होईपर्यंत खेळू शकतात, त्यात काही गैर नाही. ते सर्वजण अगदी तंदुरुस्त आहेत आणि जोपर्यंत तुम्ही धावा काढत आहात किंवा विकेट घेत आहात तोपर्यंत वय हा घटक असावा असे मला वाटत नाही. अजिंक्य रहाणेशिवाय एकाही फलंदाजाला चांगली कामगिरी करता आली नव्हती. त्यामुळे पुजाराला बळीचा बकरा का बनवले गेले हे निवडकर्त्यांनी स्पष्ट करणे आवश्यक आहे,” असे गावस्कर म्हणाले. 

टॅग्स :भारत विरुद्ध वेस्ट इंडिजसुनील गावसकरचेतेश्वर पुजाराबीसीसीआय
Open in App