Join us  

वर्ल्ड कप अपयशानंतरही कोहली कर्णधारपदी कायम कसा, सुनील गावस्कर यांचा सवाल

भारतीय संघाला वर्ल्ड कप स्पर्धेत उपांत्य फेरीत न्यूझीलंडकडून पराभव पत्करावा लागला.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2019 3:07 PM

Open in App

मुंबई : भारतीय संघाला वर्ल्ड कप स्पर्धेत उपांत्य फेरीत न्यूझीलंडकडून पराभव पत्करावा लागला. वर्ल्ड कप स्पर्धेनंतर भारतीय संघ वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाणार आहे. त्यासाठी निवडण्यात आलेल्या संघाचे नेतृत्व विराट कोहलीकडे कायम राखण्यात आल्यानं माजी कसोटीपटू सुनील गावस्कर यांनी नाराजी प्रकट केली आहे. निवड समितीनं कोणतिही चर्चा न करता कोहलीची कर्णधारपदी फेरनियुक्ती केलीच कशी, असा सवालही त्यांनी केला. 

Mid-Day या इंग्रजी वृत्तपत्रात त्यांनी लिहीले की,''वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी संघ निवडण्यापूर्वी निवड समितीनं कर्णधारपदासाठी बैठक बोलवायला हवी होती. विराट कोहली अपेक्षांवर खरा उतरलेला नाही. माझ्या माहितीनुसार त्याचे कर्णधारपद हे वर्ल्ड कप स्पर्धेपर्यंतच होते. त्यानंतर कर्णधारपदासाठी निवड समितीनं बैठक बोलावणे अपेक्षित होते.'' 

दरम्यान, एमएसके प्रसाद यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीनं वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी निवडलेल्या तीनही संघाचे कर्णधारपद कोहलीकडे दिले आहे. त्यावर गावस्कर म्हणाले,''निवड समिती लंगड्या बदकासारखी आहे. कर्णधारपदी फेरनियुक्ती केल्यानंतर कोहलीला संघ निवडण्यासाठी बोलावण्यात आले. संघातून केदार जाधव, दिनेश कार्तिक यांना डच्चू देण्यात आला. त्यांची कामगिरी निराशाजनक झाली होती, पण मग कोहलीलाही अपेक्षांवर खरं उतरता आलं नाही.''  

रोहित सोबतच्या वादावर कॅप्टन कोहली आज काय बोलणार?वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी आज भारतीय संघ अमेरिकेला रवाना होणार आहे. वेस्ट इंडिज दौऱ्याआधी कोहली पत्रकारांशी संवाद साधणार नाही अशा चर्चा रंगल्या होत्या. मात्र, कर्णधार कोहली पत्रकार परिषदेला उपस्थित राहणार असल्याची माहिती, बीसीसीआयनं दिली. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि उप-कर्णधार रोहित शर्मा यांच्यातील वाद दिवसेंदिवस वाढत आहे. वर्ल्ड कप 2019मध्ये भारताच्या पराभवानंतर रोहित आणि विराट यांच्यात वादाला सुरुवात झाली होती. तसेच रोहितने विराटची पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माला इंन्स्टाग्रामवर अनफॉलो केल्यानंतर प्रसार माध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा रंगल्या होत्या. यानंतर या विषयावर विराट काय बोलणार तसेच पत्रकारांना या विषयावरची योग्य ती उत्तरे देणार कि नाही हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

टॅग्स :विराट कोहलीसुनील गावसकरभारत विरुद्ध वेस्ट इंडिजबीसीसीआय