Join us  

Sunil Gavaskar on Hardik Pandya Gujarat Titans, IPL 2022: गुजरात टायटन्सच्या यशामागचं रहस्य काय? सुनील गावसकर काय म्हणतात वाचा...

गुजरातला प्ले-ऑफमध्ये प्रवेश करण्यासाठी एका विजयाची आवश्यकता

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2022 5:51 PM

Open in App

Sunil Gavaskar on Hardik Pandya Gujarat Titans, IPL 2022 : यंदाच्या हंगामात गुजरात टायटन्स आणि लखनौ सुपर जायंट्स या दोन नव्या संघांनी दमदार कामगिरी केली. लखनौच्या संघाचा प्रवास काहीसा चढ-उताराचा होता. पण गुजरातच्या संघाने अतिशय चांगली कामगिरी केली. IPL 2022 गुणतालिकेत गुजरात टायटन्स ११ सामन्यांत आठ विजयांसह दुसऱ्या स्थानावर आहे. आता हार्दिक पांड्याच्या संघाला कंपनी प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यास फक्त एक विजय आवश्यक आहे. IPLच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ असलेले मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स यांना स्पर्धेत फारसं यश मिळालं नाही. असं असताना नवख्या गुजरात टायटन्सच्या यशाचं रहस्य काय याबद्दल भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी मत व्यक्त केलं.

भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर IPL 2022 मधील नवोदित गुजरात टायटन्सच्या यशाबद्दल बोलताना म्हणाले की निर्भिड खेळ आणि निकालाबाबत फारसा विचार न करणे हे त्यांच्या यशाचे गमक आहे. "गुजरात टायटन्सचा संघ अतिशय निर्भिडपणे खेळतो. त्यांचा खेळाकडे पाहण्याचा दृष्टीकोन वेगळा आहे. हारण्याचं त्यांना अजिबात भय नाही. ते स्वतंत्र्य विचारांनी खेळत राहतात. त्यामुळे ते सातत्याने सामने जिंकत आहेत."

"तुम्हाला नेहमीच प्रत्येक सामना जिंकायचा असतो. अगदी तुम्ही घरच्या अंगणात खेळत असाल तरीही तुम्हाला विजय हवा असतो. याचा अर्थ असा नाही की पराभव झाला म्हणजे सारं काही संपलं. पण गुजरातच्या संघाचा खेळाकडे पाहण्याचा दृष्टीकोन खूपच वेगळा आहे. ते प्रत्येक सामना एन्जॉय करत असतात. ते खेळताना प्रचंड सकारात्मक असतात. त्यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणावर यश मिळतंय", असे गावसकर म्हणाले.

टॅग्स :आयपीएल २०२२सुनील गावसकरगुजरात टायटन्सहार्दिक पांड्या
Open in App