Join us  

सुनील गावस्करांचा BCCI ला सल्ला; मग खेळाडू 'रणजी' कडे पाठ फिरवणार नाहीत

इशान किशनसारख्या खेळाडूंचे उदाहरण देताना गावस्कर यांनी जास्त फी आणि देशांतर्गत स्पर्धांमधून खेळाडूंची माघार या मुद्द्यावर प्रकाश टाकला.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2024 3:44 PM

Open in App

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( BCCI ) नुकताच खेळाडूंना आंतरराष्ट्रीय कर्तव्यावर नसताना देशांतर्गत क्रिकेट खेळण्याचा सल्ला दिला. इशान किशन आणि श्रेयस अय्यर यांनी हा सल्ला दुर्लक्षित केल्यानं त्यांना वार्षिक करारातून हटवण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला. त्यात आंतरराष्ट्रीय कसोटीलाही खेळाडूंनी प्राधान्य द्यावे यासाठी प्रोत्साहनपर रक्कम जाहीर केली. आता भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी BCCI कडे देशांतर्गत क्रिकेटपटूंच्या पगारात वाढ करण्याची विनंती केली आहे, विशेषत: प्रथम श्रेणी क्रिकेटशी निगडित असलेल्या. 

गावस्कर म्हणाले, ''बीसीसीआयने खेळाडूंना प्रोत्साहनपर बक्षीस देणे ही एक आश्चर्यकारक गोष्ट आहे, परंतु मी बोर्डाला विनंती करतो की रणजी करंडक स्पर्धेचीही काळजी घेतली पाहिजे. जर रणजी ट्रॉफीची फी दुप्पट किंवा तिप्पट केली जाऊ शकते, तर नक्कीच बरेच क्रिकेटपटू रणजी ट्रॉफी खेळतील. रणजी ट्रॉफीचे सामने खेळण्याची फी चांगली असेल, तर विविध कारणांमुळे याकडे दुलर्क्ष करणारे खेळाडूही कमी होतील.''

इशान किशनसारख्या खेळाडूंचे उदाहरण देताना गावस्कर यांनी जास्त फी आणि देशांतर्गत स्पर्धांमधून खेळाडूंची माघार या मुद्द्यावर प्रकाश टाकला. गावस्कर यांनी रेड-बॉल क्रिकेटसाठी पुरस्कारांबाबत राहुल द्रविडच्या सल्ल्याशी सहमती दर्शवली. रणजी ट्रॉफी खेळांच्या वेळापत्रकाबद्दल खेळाडूंनी उपस्थित केलेल्या चिंतेचे निराकरण करताना, गावस्कर यांनी पुरेशी विश्रांती आणि पुनर्प्राप्तीसाठी सामन्यांमध्ये दीर्घ विश्रांतीची मागणी केली. गावस्कर यांनी खेळाडूंची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी आणि डिसेंबरच्या मध्यात व्हाईट-बॉल स्पर्धा, त्यानंतर रणजी हंगाम जानेवारी ऐवजी ऑक्टोबरमध्ये सुरू करण्याचे सुचवले.

गावस्कर म्हणाले, ''तीन दिवसांच्या कालावधीत असे घडते की प्रवासासाठी कदाचित एक दिवस असावा. प्रवासादरम्यान फिजिओकडे जायला वेळ मिळत नाही. त्यामुळे खेळाडूला पुरेसा वेळ मिळावा म्हणून कदाचित थोडे अंतर असावे. ऑक्टोबर ते डिसेंबरच्या मध्यापर्यंत रणजी करंडक स्पर्धा आयोजित करावी आणि त्यानंतर पांढऱ्या चेंडूच्या स्पर्धा सुरू कराव्यात, असे माझे वैयक्तिक मत आहे. अशाप्रकारे, जे भारताकडून खेळत आहेत त्यांच्याशिवाय प्रत्येकजण खेळण्यासाठी उपलब्ध असेल. माघार घेण्याचे कोणतेही कारण मिळणार नाही. जानेवारीपासून वन डे सामने सुरू झाल्याने, जे आयपीएलमध्ये खेळत आहेत त्यांना तेव्हापासून पुरेसा सराव मिळू शकेल. 

टॅग्स :सुनील गावसकररणजी करंडकबीसीसीआय