Join us  

पेनसाठी धावाधाव अन् धोनी जवळ येताच शर्टवर घेतली ऑटोग्राफ; सुनील गावसकरांनी जिंकली मनं

कोलकाताविरुद्ध चेन्नईच्या या सामन्यात एक खास क्षण पाहायला मिळाला.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2023 12:25 PM

Open in App

कोलकाता नाइट रायडर्सने (केकेआर) प्ले ऑफ गाठण्याच्या आशा कायम राखताना चेन्नई सुपरकिंग्जला ६ गड्यांनी नमवले. चेन्नईला २० षटकांत ६ बाद १४४ धावांवर रोखल्यानंतर कोलकाताने १८.३ षटकांत ४ बाद १४७ धावा केल्या. कर्णधार नितिश राणा आणि रिंकू सिंग यांची अर्धशतकी खेळी कोलकातासाठी मोलाची ठरली.

लक्ष्याचा पाठलाग करताना कोलकाताची पाचव्या षटकात ३ बाद ३३ धावा अशी अवस्था झाली. येथून कर्णधार नितिश राणा आणि यंदाचे आयपीएल गाजवलेल्या रिंकू सिंग यांनी संघाला विजयी मार्गावर आणत चौथ्या गड्यासाठी ७६ चेंडूंत ९९ धावांची निर्णायक भागीदारी केली. रिंकूने ४३ चेंडूंत ४ चौकार व ३ षट्कारांसह ५४ धावा फटकावल्या. नितिशने ४४ चेंडूंत ६ चौकार व एका षट्कारांसह नाबाद ५७ धावा केल्या. १८व्या षटकात रिंकू धावबाद झाला. यानंतर नितिशने आंद्रे रसेलसोबत (२*) संघाच्या विजयात शिक्का मारला. 

कोलकाताविरुद्ध चेन्नईच्या या सामन्यात एक खास क्षण पाहायला मिळाला. भारताचे दिग्गज खेळाडू सुनील गावसकर हे मैदानात धावा-धाव करत MS धोनीजवळ आले पोहोचवले आणि त्याच्या शर्टवर ऑटोग्राफ देण्याची विनंती केली. धोनीने देखील कोणत्याही क्षणाचा विलंब न करता सुनील गावसकरांच्या शर्टवर ऑटोग्राफ दिली. क्रिकेट जगतातील भारताच्या या दोन दिग्गजांचा हा ऐतिहासिक क्षण कॅमेऱ्यात कैद करून ठेवण्यासारखा होता.  

पोस्ट मॅच शो दरम्यान सुनील गावसकर यांनी कॅमेरामनला शर्ट झूम करण्यास सांगितले कारण त्यांना माहीचा ऑटोग्राफ दाखवायचा होता. संपूर्ण टीमसोबत मैदानावर फेरफटका मारणार हे ऐकताच मी कोणाकडून तरी लगेच पेन घेतला आणि शांतपणे माझ्याकडे ठेवला. त्यानंतर धोनीजवळ येताच मी ऑटोग्राफ मागितली, असं गावसकर म्हणाले. धोनीवर कोण प्रेम करत नाही? गेल्या काही वर्षांत त्याने भारतीय क्रिकेटसाठी जे केले ते खूप अलौकिक आहे. मुख्य म्हणजे तो एक तरुण खेळाडूंचा आदर्श राहिला आहे, असं गावसकर यांनी सांगितले.  

दरम्यान, कोलकाताने दमदार गोलंदाजी करताना चेन्नईला जखडवून ठेवले. वरुण चक्रवर्थी आणि सुनील नरेन यांनी चेन्नईला मोक्याच्या वेळी जबर धक्के दिले. परंतु, शिवम दुबेच्या झुंजार फटकेबाजीमुळे चेन्नईने समाधानकारक मजल मारली. प्रमुख फलंदाज अपयशी ठरल्यानंतर दुबेने ३४ चेंडूंत नाबाद ४८ धावा फटकावताना १ चौकार व ३ षट्का मारले. त्याने रवींद्र जडेजासोबत सहाव्या गड्यासाठी ५३ चेंडूंत ६८ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी करत संघाला पुनरागमन करून दिले जडेजाने २४ चेंडूंत एका षट्कारासह २० धावा केल्या. डीवोन कॉन्वेने २८ चेंडूंत ३ चौकारांसह ३० धावा केल्या चेन्नईचा ७२ धावांवर अर्धा संघ गमावला होता.

टॅग्स :एम. एस. धोनीसुनील गावसकरआयपीएल २०२३चेन्नई सुपर किंग्स
Open in App