भारताविरुद्ध होणा-या तीन टी-२० सामन्यांसाठी दक्षिण आफ्रिकेचे नेतृत्व ड्युमिनीकडे

भारताविरुद्ध होणा-या तीन टी-२० सामन्यांसाठी दक्षिण आफ्रिकेने मंगळवारी संघाची घोषणा केली. १४ जणांच्या आफ्रिका संघाचे नेतृत्व डावखुरा फलंदाज जे. पी. ड्युमिनीकडे सोपविण्यात आले आहे. १८ फेब्रुवारीपासून मालिकेला सुरुवात होणार आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2018 06:26 IST2018-02-14T00:32:43+5:302018-02-14T06:26:00+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
Submit Answer to Birthdate - High Court | भारताविरुद्ध होणा-या तीन टी-२० सामन्यांसाठी दक्षिण आफ्रिकेचे नेतृत्व ड्युमिनीकडे

भारताविरुद्ध होणा-या तीन टी-२० सामन्यांसाठी दक्षिण आफ्रिकेचे नेतृत्व ड्युमिनीकडे

जोहान्सबर्ग : भारताविरुद्ध होणा-या तीन टी-२० सामन्यांसाठी दक्षिण आफ्रिकेने मंगळवारी संघाची घोषणा केली. १४ जणांच्या आफ्रिका संघाचे नेतृत्व डावखुरा फलंदाज जे. पी. ड्युमिनीकडे सोपविण्यात आले आहे. १८ फेब्रुवारीपासून मालिकेला सुरुवात होणार आहे.
आगामी आॅस्ट्रेलियाविरुद्धची कसोटी मालिका लक्षात घेता, दक्षिण आफ्रिकेच्या निवड समितीने कागिसो रबाडा, मॉर्ने मोर्केल आणि लुंगी एनगिडी या तीन जलदगती गोलंदाजांना विश्रांती दिली आहे; सोबत फलंदाजांमध्ये एडन मार्करम आणि हाशिम आमला या दोघांनाही विश्रांती देण्यात आली आहे. मात्र एबी डिव्हिलियर्सला टी-२० मालिकेच्या संघात स्थान देण्यात आले. आफ्रिकेच्या निवड समितीने टी-२० संघात तीन तरुण खेळाडूंना संधी दिली आहे. (वृत्तसंस्था)

द. आफ्रिका संघ
जे. पी. ड्युमिनी(कर्णधार), फरहान बेहर्डियन, ज्युनिअर डाला, एबी डिव्हिलियर्स, रेझा हेंड्रीक्स, ख्रिस्टियन जोंकर, हेन्रिक्स क्लासेन, डेव्हिड मिलर, ख्रिस मॉरिस, ड्युएन पॅटरसन, अ‍ॅरोन फंगिसो, अँडल फेलुकवायो, तबरेझ शम्सी, जे.जे. स्मट्स.

Web Title: Submit Answer to Birthdate - High Court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.