Join us  

Stuart Broad retire: उद्या किंवा सोमवार माझा क्रिकेटमधील शेवटचा दिवस! ८४५ विकेट्स घेणाऱ्या स्टुअर्ट ब्रॉडची निवृत्ती 

Ashes मालिकेतील पाचव्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी इंग्लंडचा प्रमुख गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडने ( Stuart Broad) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून अचानक निवृत्ती जाहीर केली

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2023 11:40 PM

Open in App

Ashes मालिकेतील पाचव्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी इंग्लंडचा प्रमुख गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडने ( Stuart Broad) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून अचानक निवृत्ती जाहीर केली. ''उद्या किंवा सोमवारी माझा क्रिकेटमधील शेवटचा दिवस असेल. हा प्रवास संस्मरणीय होता. या ऐतिहासिक मालिकेतील भाग असल्याचा मला अभिमान आहे आणि मला नेहमीच कारकीर्दिचा शेवट यशशिखरावर असताना करायचा होता,''असे ब्रॉडने सांगितले.  

२००६ मध्ये वन डे व ट्वेंटी-२० संघातून पदार्पण करणारा ब्रॉड भारतीयांच्या लक्षात आहे तो युवराज सिंगने मारलेल्या ६ षटकारांमुळे. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २००७मध्ये युवीने इंग्लंडच्या गोलंदाजाची बेक्कार धुलाई केली होती. पण, हा युवा गोलंदाज भविष्यात महान खेळाडूंच्या पंक्तित जाऊन बसेल, असा कुणी विचारही केला नव्हता. कारकीर्दिचा शेवट करत असताना ब्रॉडच्या नाववार ८४५ विकेट्स आहेत. त्याने ५६ ट्वेंटी-२०त ६५, १२१ वन डे सामन्यांत १७८ आणि १६७ कसोटींत ६०२* विकेट्स घेतल्या आहेत. जेम्स अँडरसनसोबत त्याने वर्षांनुवर्षे इंग्लंडच्या कसोटी क्रिकेटमधील गोलंदाजीची धुरा यशस्वीपणे सांभाळली आहे.

कसोटी क्रिकेटमध्ये अँडरसननंतर ४००+ विकेट्स घेणारा ब्रॉड हा दुसरा इंग्लिश गोलंदाज आहे. २०१५च्या अॅशेस कसोटीत त्याने ट्रेंट ब्रिजवर १५ धावांत ८ विकेट्स घेताना ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण संघ १८.३ षटकांत ६० धावांत तंबूत पाठवला होता. 

टॅग्स :स्टुअर्ट ब्रॉडइंग्लंडअ‍ॅशेस 2019युवराज सिंग
Open in App