Join us  

त्या दोघींच्या लग्नाची गोष्ट; द. आफ्रिकेच्या दोन महिला क्रिकेटपटू विवाहबंधनात 

दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट संघाची कर्णधार डेन व्हेन निएकेर्क हीने संघसहकारी मॅरीझने कॅप्पे हिच्याशी रविवारी विवाह केला.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 09, 2018 7:26 PM

Open in App

मुंबई -  दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट संघाची कर्णधार डेन व्हेन निएकेर्क हीने संघसहकारी मॅरीझने कॅप्पे हिच्याशी रविवारी विवाह केला. न्यू़झीलंडच्या अॅमी सॅटर्थवेट आणि ली टॅहूहू यांच्यानंतर विवाहबंधनात अडकलेले हे दुसरे महिला क्रिकेटपटूंचे जोडपे आहे. कॅप्पने सोशल मीडियावर फोटो टाकून लग्नाची घोषणा केली.  प्रेटोरीया येथे 1993 साली जन्मलेल्या निएकेर्कने 1 कसोटी, 95 वन डे आणि 68 टी-20 सामन्यांत दक्षिण आफ्रिका संघाचे प्रतिनिधी केले आहे. 95 वन डेत तिच्या नावावर 1770 धावा आहेत आणि त्यात 7 अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच तिच्या नावावर 125 विकेट्सही आहेत. टी-20मध्ये तिने 28.28 च्या सरासरीने 1469 धावा केल्या आणि 49 विकेट्स घेतले आहेत. तिला 2017-18चा आफ्रिकेच्या सर्वोत्तम महिला क्रिकेटपटूच्या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेची कर्णधार कॅप्पने 1 कसोटी, 93 वन डे आणि 63 टी-20 सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केले आहे.  वन डे आणि टी-20 मध्ये तिने अनुक्रमे 1618 आणि 600 धावा केल्या आहेत. 2017 मध्ये ऑस्ट्रेलियाची क्रिकेटपटू एसली व्हिलानीने लेस्बीयन असल्याचे जाहीर केले होते. सहकारी निकोल बॉल्टनशी तिचे प्रेमसंबंध होते. त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या पार्लामेंटमध्ये समलींगी विवाहावर चर्चा झाली होती. त्यावेळी ऑस्ट्रेलियाच्याच मेगन श्कटने तिच्या सहकारीला चुंबन देत समलींगी विवाहाला होकार असल्यासंदर्भात एक फोटो सोशल मीडियावर प्रसिद्ध केला होता.  

टॅग्स :क्रिकेटद. आफ्रिकाक्रीडा