Join us  

अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत स्टोक्स अव्वल; आयसीसी कसोटी क्रमवारी

जेसन होल्डरला टाकले मागे

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2020 10:52 PM

Open in App

दुबई : वेस्ट इंडिजविरुद्ध दुसºया कसोटीत धडाकेबाज कामगिरी करणारा बेन स्टोक्स याने आयसीसीच्या अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत अव्वल स्थान पटकावले तर फलंदाजांच्या यादीत तो तिसºया स्थानी आला. अष्टपैलूंच्या यादीत त्याने वेस्ट इंडिजचा कर्णधार जेसन होल्डर याला मागे टाकले आहे.

अ‍ॅन्ड्र्यू फ्लिंटॉफनंतर अष्टपैलूंच्या यादीत अव्वल ठरणारा स्टोक्स पहिलाच इंग्लिश खेळाडू ठरला. स्टोक्सची कारकिदीर्तील ही सर्वोत्तम कामगिरी आहे. अव्वल पाच अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत रवींद्र जडेजा आणि रविचंद्रन अश्विन हे भारतीय खेळाडू अनुक्रमे तिसºया तसेच पाचव्या स्थानी आहेत. काल संपलेल्या कसोटीत स्टोक्सने दमदार कामगिरी केली.

पहिल्या डावात त्याने १७६ आणि दुसºया डावात नाबाद ७८ धावा केल्या. दोन्ही डाव मिळून त्याने तीन बळी घेतले. या कामगिरीसाठी त्याला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. तसेच कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीतदेखील त्याने मार्नस लाबूशेनला मागे टाकून तिसरे स्थान पटकावले. आता त्याच्या पुढे आॅस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ आणि भारताचा विराट कोहली दोन फलंदाज आहेत. (वृत्तसंस्था)

अष्टपैलू बेन स्टोक्स हा संघात महान प्रतिभावान खेळाडू असल्याचे कौतुक इंग्लंडचा कर्णधार ज्यो रूट याने केले. सामनावीर पुरस्कार विजेत्या स्टोक्सने विंडीजविरुद्ध दमदार कामगिरी करीत विजयासह मालिकेत बरोबरी साधून दिली. सामन्यानंतर रूट म्हणाला, ‘संघासाठी सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या स्टोक्सला विश्व क्रिकेटमध्ये सर्वोत्कृष्ट स्थान मिळाले. या महान खेळाडूवर अधिक ओझे टाकणे योग्य होणार नाही. ’ परिस्थितीशी एकरूप होण्याची त्याच्यात अनन्यसाधारण क्षमता आहे. स्थिती ओळखून खेळणारा बेन आमच्यासाठी किती उपयुक्त आहे, हे शब्दात व्यक्त करणे कठीण असल्याचे रूट म्हणाला.

टॅग्स :इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिजबेन स्टोक्स