स्टोक्सला रसेलसारखा खेळ करावा लागेल

राजस्थान रॉयल्स व सनरायझर्स हैदराबाद संघांना पुढील लढतीत पुनरागमन करावे लागेल. पहिल्या लढतीत दोन्ही संघ एकवेळ चांगल्या स्थितीत होते आणि दोन्ही संघ विजयी ठरतील असे वाटत होते.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2019 01:02 AM2019-03-29T01:02:38+5:302019-03-29T01:04:01+5:30

whatsapp join usJoin us
 Stokes has to play like Russell | स्टोक्सला रसेलसारखा खेळ करावा लागेल

स्टोक्सला रसेलसारखा खेळ करावा लागेल

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

- हर्षा भोगले लिहितात...

राजस्थान रॉयल्स व सनरायझर्स हैदराबाद संघांना पुढील लढतीत पुनरागमन करावे लागेल. पहिल्या लढतीत दोन्ही संघ एकवेळ चांगल्या स्थितीत होते आणि दोन्ही संघ विजयी ठरतील असे वाटत होते. पण, सनरायझर्सला आंद्रे रसेलच्या शानदार खेळीमुळे पराभव स्वीकारावा लागला. त्याचवेळी रॉयल्सपुढेही मोठे आव्हान आहे.

किंग्स इलेव्हनविरुद्धच्या सलामी लढतीनंतर राजस्थानच्या तंबूत राग नक्कीच असेल, पण ते सर्व विसरुन त्यांना पुढे वाटचाल करावी लागणार आहे. दुसऱ्या टोकावर क्रिझच्या आतामध्ये राहावे लागेल, याचीही त्यांना कल्पना आली असेल. नियम व खिलाडूवृत्ती यांच्यातील स्पर्धेत विजय नेहमी नियमाचा होतो. विश्वकप स्पर्धेपर्यंत नियम हेच सांगतो की दुसऱ्या टोकावर चेंडू टाकेपर्यंत क्रिझमध्ये असणे आवश्यक आहे. यात सर्व चर्चा संपते आणि आता लोकांनी खेळावर लक्ष द्यायला हवे.

रॉयल्स केवळ एक चांगला संघच नाही तर तीन दिग्गज खेळाडूच्या उपस्थितीमुळे उत्साहित झालेला संघ आहे. आगेकूच करण्यासाठी या सर्वांना चांगली कामगिरी करावी लागेल. बटलर व आर्चर चांगल्या फॉर्मात दिसत आहे, पण स्टोक्सला आपला आयपीएलप्रमाणे फॉर्म मिळवावा लागेल. केकेआरसाठी रसेल जे काही करत आहे, तेच स्टोक्सला रॉयल्ससाठी करावे लागेल. हे दोघेही वेगळ्या पद्धतीचे क्रिकेटपटू आहे. स्टोक्स क्रिकेटच्या तिन्ही स्वरुपात खेळतो, पण त्याला आपल्या योग्यतेनुसार खेळावर वर्चस्व गाजवावे लागेल.
माझ्या मते सनरायझर्स संघाला विलियम्सन केव्हा परतणार, याची चिंता असेल. ते बिली स्टेनलेकला खेळविण्याचा विचार करू
शकतात. कारण भारताच्या वेगवान गोलंदाजांचे त्रिकूट बºयाच अंशी एकसारखे आहे. शुक्रवारची लढत शानदार होईल, अशी आशा आहे. (टीसीएम)

Web Title:  Stokes has to play like Russell

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.