Join us

तरीही झळकणार चीअरलीडर्स, फ्रेन्चायजींनी नवा उपाय शोधला

सामन्याच्यावेळी एक भव्य स्क्रिन लावला जाईल. टीव्ही प्रेक्षकांना यावर चाहत्यांच्या प्रतिक्रिया तसेच चीअर लीडर्सचे रेकॉर्डेड व्हिडिओ दाखविले जातील.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2020 00:05 IST

Open in App

नवी दिल्ली : आयपीएलची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. कोरोनामुळे यूएईत प्रेक्षक नसलेल्या रिकाम्या स्टेडियममध्ये सामने खेळविले जातील. अशावेळी खेळाडूंना चीअर करण्यासाठी सर्व फ्रेन्चायजींनी एका नवा उपाय शोधला.सामन्याच्यावेळी एक भव्य स्क्रिन लावला जाईल. टीव्ही प्रेक्षकांना यावर चाहत्यांच्या प्रतिक्रिया तसेच चीअर लीडर्सचे रेकॉर्डेड व्हिडिओ दाखविले जातील. एक फ्रेन्चायजी अधिकारी म्हणाला, ‘प्रेक्षक व चीअरलीडर्स यांचे रेकॉर्डेड व्हिडिओ दाखवून खेळाडूंसाठी प्रेक्षकांची लाईव्ह उपस्थिती दाखविण्याचा हा एक चांगला उपाय असेल.’

टॅग्स :आयपीएल