Join us  

स्टीव्हन स्मिथ आयपीएल खेळणार, पण करता नाही येणार नेतृत्व

ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्हन स्मिथला आता आयपीएल खुणावते आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 06, 2019 4:17 PM

Open in App

नवी दिल्ली : चेंडूशी छेडछाड केल्यामुळे बंदी घालण्यात आलेल्या ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्हन स्मिथला आता आयपीएल खुणावते आहे. आयपीएलमध्ये स्थिमने फलंदाजीबरोबर नेतृत्वही केलं होतं. पण आता यापुढे त्याला आयपीएलमध्ये खेळता येणार असले तरी त्याला नेतृत्व मात्र करता येणार नाही.

जेव्हा स्मिथने चेंडूशी छेडछाड केली होती, तेव्हा त्याच्यावर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने एका वर्षाची बंदी घातली होती. ही बंदी आता मार्च महिन्यामध्ये उठणार आहे. त्यामुळे स्मिथ आता आयपीएल खेळू शकतो. गेल्यावर्षी बंदी असल्यामुळे त्याला आयपीएल खेळता आले नव्हते. त्यामुळे या वर्षी तो आयपीएल खेळणार असला तरी त्याला नेतृत्व मात्र करता येणार नाही.

क्रिकेट ऑस्ट्रेलियाने स्मिथवर जेव्हा एका वर्षाची बंदी घातली, तेव्हा तो दोन वर्षे नेतृत्व करू शकत नाही, असेही म्हटले होते. त्यामुळे आता स्मिथला नेतृत्व करता येणार नाही, असे म्हटले जात आहे. पण स्मिथ ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व करता येणार नाही  की अन्य संघाचे, हे अजून स्पष्ट करण्यात आलेले नाही. जर स्मिथ कुठेही नेतृत्व करू शकत नाही, अशी जर शिक्षा असेल तर त्याला आयपीएलमध्ये नेतृत्व करता येणार नाही.

टॅग्स :स्टीव्हन स्मिथआयपीएल