लोकमतच्या कार्यालयात फ्लेमिंगची भेट घेण्यासाठी आलेल्या वाचकांना बॅट भेट म्हणून देण्यात आली. लोकमतमधील भेटीदरम्यान फ्लेमिंग आणखी काय म्हणाला हे सविस्तर वाचा लोकमतच्या उद्याच्या अंकात....
फलंदाजी करताना असलेला तणाव गोल्फ खेळताना जाणवत नाही असे मत फ्लेमिंगने व्यक्त केले.
भारतीय प्रेक्षकांच्या पाठिंब्याने नेहमी थक्क होतो क्रिकेटला जिवंतपणा देण्याचे काम ते करतात असे फ्लेमिंगने आवर्जून नमूद केले.
डावखु-या फलंदाजांमध्ये डेवीड वॉर्नर क्रिस गेल कोरी अॅण्डरसन हे फेव्हरिट असल्याचे फ्लेमिंग म्हणतो.
विश्वचषकापूर्वीचा ऑस्ट्रेलिया दौरा भारतासाठी फायद्याचा असून या दौ-यात टेन्शन फ्री खेळ करण्याचा सल्लाही फ्लेमिंगने भारतीय संघाला दिला.
आगामी विश्वचषकात भारताचा सुरेश रैना कमाल दाखवेल अशी अपेक्षा स्टिफन फ्लेमिंगने व्यक्त केली.
न्यूझीलंडमध्ये बाईकने भ्रमंती करता येईल का असा प्रश्न विचारला असता फ्लेमिंग म्हणतो महेंद्रसिंग धोनीने ऑकलंड ते हॅमिल्टन बाईकने प्रवास केला आहे. त्यामुळे बाईकवर भटकंती करणे सहज शक्य आहे.
वर्ल्डकप जेतेपदासाठी दक्षिण आफ्रिकाही प्रबळ दावेदार असून भारताला ऑस्ट्रेलिया न्युझीलंडचे आव्हान असेल असे मत फ्लेमिंगने मांडले.
न्युझीलंडचा माजी कर्णधार स्टिफन फ्लेमिंगने शुक्रवारी मुंबईतील लोकमत कार्यालयाला भेट दिली. या भेटीदरम्यान फ्लेमिंगने २०१५ मध्ये होणारे विश्वचषक न्यूझीलंडमधील भ्रमंती भारतीय क्रिकेट अशा विविध विषयांवर मनमोकळी उत्तरं दिली. न्यूझीलंड टुरिजमचे आशियातील जनरल मॅनेजर डेव्हीड क्रेगही याप्रसंगी उपस्थित होते.