Join us  

श्रीलंकेच्या कर्णधाराची 'फेक फिल्डिंग', पंचांचा कानाडोळा, विराट कोहली नाराज

सामन्याचे पहिले तीन दिवस पावसाचे आणि पाहुण्या संघाच्या वर्चस्वाचे राहिले, मात्र तिसऱ्या दिवशी पंचाच्या एका चुकीमुळे भारताला पाच धावांचे नुकसान झालं आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2017 8:33 AM

Open in App

कोलकाता - भारत आणि श्रीलंका संघामध्ये कोलकाताच्या ईडन गार्डन मैदानावर पहिली कसोटी सुरू आहे. सामन्याचे पहिले तीन दिवस पावसाचे आणि पाहुण्या संघाच्या वर्चस्वाचे राहिले, मात्र तिसऱ्या दिवशी पंचाच्या एका चुकीमुळे भारताला पाच धावांचे नुकसान झालं आहे. आयसीसीच्या नव्या नियमानुसार कोणत्याही क्षेत्ररक्षकाने चेंडु आपल्या ताब्यातून निसटल्यावर, चेंडू फलंदाजाच्या दिशेने थ्रो करण्याची नक्कल केल्यास प्रतिस्पर्धी संघाला 5 धावा बहाल करण्यात येतात.

तिसऱ्या दिवशी 'फेक फिल्डिंग' झाल्याचं पहायला मिळालं. 53व्या षटकांमध्ये श्रीलंकन संघाचा कर्णधार 'फेक फिल्डिंग' करत असल्याचं दिसून आलं. मात्र, त्याच्यावर पेनल्टी लावण्यात आली नाही. चंडीमलने केलेली 'फेक फिल्डिंग' अंपायरच्या लक्षात आलीच नाही. श्रीलंकन कर्णधाराची ही 'फेक फिल्डिंग' पकडली गेली असती तर टीम इंडियाला पाच रन्सचा फायदा झाला असता.

53व्या ओव्हरचा चौथा बॉल शनाकाने भुवनेश्वर कुमारला टाकला. भुवनेश्वर कुमारने हा बॉल बॅकफुटवर जात खेळला. हा बॉल पकडण्यासाठी श्रीलंकन कॅप्टन चंडीमल धावला आणि मग थ्रो करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याच्या हातात बॉलच नव्हता. तरिही त्याने थ्रो केला. नव्या नियमानुसार हा प्रकार 'फेक फिल्डिंग'मध्ये येतो.

पंच जोएल विल्सन यांनी चंडीमलशी संवाद साधून त्याला समज दिली. मात्र, यावेळी भारतीय संघाला अपेक्षित असणाऱ्या ५ धावा त्यांनी बहाल केल्या नाहीत. या निर्णयामुळे कर्णधार विराट कोहलीही ड्रेसिंग रुममध्ये चांगलाच नाराज झालेला पहायला मिळाला पावसाच्या व्यत्ययामुळे पहिल्या तीन दिवस पूर्ण खेळ होऊ शकला नाही. भारतानं पहिल्या डावात सर्वबाद 172 धावा केल्या आहेत. प्रत्युत्तर लाहिरू थिरिमाने व अँजेलो मॅथ्यूज यांनी वैयक्तिक अर्धशतके झळकावताना तिस-या विकेटसाठी केलेल्या दमदार भागीदारीच्या जोरावर श्रीलंकेने भारताविरुद्ध खेळल्या जात असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात तिस-या दिवसअखेर पहिल्या डावात ४ बाद १६५ धावांची मजल मारत वर्चस्व राखले.

म्हणून तिसरे पंच मैदानावर उतरले

ईडन गार्डन मैदानावर सुरु असलेल्या कसोटी सामन्याचे पहिले दोन दिवस पावसामुळे खेळ वाया गेले, मात्र तिसऱ्या दिवसाचा खेळ वेळेत सुरू झाला. यादरम्यान फिल्ड अंपायर रिचर्ड केटलबोरो मैदानात उतरले नाहीत. त्यांच्याऐवजी तिसरे पंच जोएल विल्सन आणि दुसरे पंच नायजेल लांग मैदानावर उतरले. त्यानंतर खेळ सुरू झाला. बंगाल क्रिकेट संघाचे अधिकाऱ्यांनी याबाबत बोलताना असे सांगितले की, केटलबोरो यांच्या गळ्यात संक्रमण झाल्याने ते मैदानात उतरले नाहीत. त्याऐवजी वेस्ट इंडिजच्या विल्सन यांनी पंच म्हणून कमान सांभाळली आहे. चौथे पंच अनिल चौधरी यांना टीव्ही अंपायर करण्यात आले आहे, तर बंगाल क्रिकेट संघाचे विनोद ठाकूर यांना पंचांच्या बोर्डमध्ये सहभागी करण्यात आले आहे.

टॅग्स :क्रिकेटविराट कोहलीश्रीलंकाबीसीसीआय