Join us  

Sri Lanka vs South Africa: श्रीलंकेचा चार वर्षानंतर द. आफ्रिकेवर विजय

सुरंगा लकमलने चुरशीच्या सामन्यांत तीन महत्त्वपूर्ण विकेट घेत श्रीलंकेला दक्षिण आफ्रिकेविरूद्ध 11 वन डे सामन्यांनंतर पहिला विजय मिळवून दिला.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 09, 2018 12:04 PM

Open in App

कोलोंबो - सुरंगा लकमलने चुरशीच्या सामन्यांत तीन महत्त्वपूर्ण विकेट घेत श्रीलंकेला दक्षिण आफ्रिकेविरूद्ध 11 वन डे सामन्यांनंतर पहिला विजय मिळवून दिला. पावसामुळे व्यत्यय आलेल्या या लढतीत यजमान श्रीलंकेने डकवर्थ लुईस प्रणालीनुसार अवघ्या 3 धावांनी थरारक विजय मिळवला. दासून शनाका (65) आणि थिसारा परेरा व कुसल परेरा यांच्या प्रत्येकी 51 धावांच्या जोरावर श्रीलंकेने चौथ्या वन डे सामन्यात 39 षटकांत 7 बाद 306 धावा चोपल्या. पावसामुळे आफ्रिकेसमोर 21 षटकांत 191 धावांचे सुधारित लक्ष्य ठेवण्यात आले होते. पण, आफ्रिकेला 9 बाद 187 धावांवर समाधान मानावे लागले. 

लकमलने आफ्रिकेचा सलामीवीर क्विंटन डी कॉकला बाद केले आणि महत्त्वाच्या क्षणी त्याने विलेम मुल्डर आणि डेव्हिड मिलर यांना बाद करताना त्याने श्रीलंकेचा विजय निश्चित केला. श्रीलंकेला यापूर्वीच्या 11 सामन्यांत आफ्रिकेविरूद्ध पराभव पत्करावा लागला होता. 2014 मध्ये पल्लेकेल येथेच त्यांनी अखेरचे आफ्रिकेला पराभूत केले होते. आफ्रिकेने पाच सामन्यांची मालिका यापूर्वीच जिंकली आहे. त्यांच्याकडे 3-1 अशी आघाडी आहे. 

टॅग्स :क्रिकेटश्रीलंकाक्रीडा