Join us  

खेळाडू हा पदार्थ खातात म्हणून श्रीलंकेचा होतो पराभव

भारातने केलेल्या या दारुण पराभवाचा वचपा काढण्यासाठी लंकेचा संघ भारताविरोधात सुरु होणाऱ्या एकदिवसीय मालिकेची जोरदार सुरुवात करतोय.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2017 8:20 PM

Open in App
ठळक मुद्देरविवारपासून 20 तारखेला दांबुला येथे भारताची लंकेविरोधात 5 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेला सुरूवात होणार भारताविरोधात होणाऱ्या पाच सामन्याच्या मालिकेत लंकेला दोन विजय मिळवने अनिवार्यश्रीलंकेच्या क्रीडा मंत्र्यांनी क्रिकेटर्सच्या फिटनेसवर सवाल उपस्थित केले होते

नवी दिल्ली, दि. 18 - टीम इंडियाने अपेक्षित विराट कामगिरी करताना श्रीलंकेला त्यांच्याच भूमीमध्ये लोळवले. विशेष म्हणजे 3 कसोटी सामन्यांची मालिका 3-0 अशी निर्विवादपणे जिंकून भारतीय संघाने परदेशात पहिल्यांदाच क्लीनस्वीप नोंदवला. भारातने केलेल्या या दारुण पराभवाचा वचपा काढण्यासाठी लंकेचा संघ भारताविरोधात सुरु होणाऱ्या एकदिवसीय मालिकेची जोरदार सुरुवात करतोय. यातच श्रीलंका क्रिकेट संघाच्या मॅनेजरने असे काही विधान केलेय ते ऐकून तुम्ही थक्क व्हाल. आधी झिम्बाब्वेनं आणि त्यानंतर भारताविरुद्धच्या निराशाजनक कामगिरीमुळे श्रीलंकेच्या ड्रेसिंग रुममध्ये बिस्कीटांवर बंदी घालण्यात आल्याचे असंका गुरुसिंहा यांनी सांगितले.  द डेली ऑबजर्वरला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ही माहिती दिली.

क्रिकेटरर्सच्या खाण्यापिण्याची जबाबदारी फिजीओ तसेच ट्रेनर यांची असते आणि त्यांना चेंजिंग रुममध्ये बिस्कीट खाण्यावर बंदी घातली आहे, असे गुरुसिंहा म्हणाले. गेल्या काही महिन्यांपासून श्रीलंकन क्रिकेटर्सच्या फिटनेसवर सातत्याने प्रश्न उपस्थित केला जातोय. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्येही पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात गचाळ क्षेत्ररक्षणामुळे श्रीलंकेला पराभवाला सामोर जाव लागले होतं. त्यानंतर श्रीलंकेच्या क्रीडा मंत्र्यांनी क्रिकेटर्सच्या फिटनेसवर सवाल उपस्थित केले होते. याच धरतीवर आता लंकेच्या खेळाडूंच्या खाण्यापिण्यावर लक्ष दिले जात आहे. 2019 च्या विश्वचषक डोळ्यासमोर ठेवून प्रत्येक संघ तयारीला लागला आहे. यामध्ये लंकाही आता मागे नाही.

रविवारपासून 20 तारखेला दांबुला येथे भारताची लंकेविरोधात 5 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेला सुरूवात होणार आहे. याच्या तयारीला दोन्ही संघ लागले आहेत. दोन्ही संघाने कसून सराव केला आहे. कालच भारतीय संघ दांबुला येथे पोहचला आहे. त्यावेळी त्यांचे पारंपारिक रितीने स्वागत करण्यात आले. भारताविरोधात होणाऱ्या पाच सामन्याच्या मालिकेत लंकेला दोन विजय मिळवने अनिवार्य आहे. तसं न झाल्यास 2019 च्या विश्वचषकात त्यांना पात्रता फेरीला सामोर जावं लागणार आहे.

टॅग्स :विराट कोहलीबीसीसीआयश्रीलंकाक्रिकेट