Join us

SRH vs RR Latest News : हैदराबाद आज राजस्थानवर विजय मिळवून करणार पराभवाची परतफेड; कोण मारणार बाजी? 

राजस्थानने १० पैकी चार तर हैदराबादने ९ पैकी ३ सामन्यात विजय मिळवला आहे.

By मुकेश चव्हाण | Updated: October 22, 2020 17:01 IST

Open in App

दुबई : राजस्थान रॉयल्स  (Rajasthan Royals) आणि सनरायजर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) संघांपुढे इंडियन प्रीमियर लीग (IPL) मध्ये ‘करा अथवा मरा’ अशी स्थिती आहे. आज उभय संघादरम्यान लढत होणार असून सनरायर्स हैदराबादला आज विजय मिळवून सुरुवातीच्या सामन्यात झालेल्या पराभवाची परतफेड करण्याची संधी आहे. 

राजस्थानने १० पैकी चार तर हैदराबादने ९ पैकी ३ सामन्यात विजय मिळवला आहे. राजस्थान सहाव्या तर हैदराबाद सातव्या स्थानावर आहेत. त्यामुळे दोन्ही संघासाठी आज होणारा सामना अत्यंत महत्वाचा असणार आहे. 

मजबूत बाजू - 

राजस्थान - जोफ्रा आर्चरच्या नेतृत्वात रॉयल्सचे गोलंदाजी आक्रमण मजबूत. फिरकीपटू श्रेयस गोपाल व राहुल तेवतिया यांची शानदार कामगिरी. गेल्या लढतीत जोस बटलरची शानदार फलंदाजी.

हैदराबाद - अव्वल चार फलंदाजांमध्ये डेव्हिड वॉर्नर, जॉनी बेयरस्टॉ, वॉर्नर, मनीष पांडे आणि केन विलियम्सन यांचा समावेश.

कमजोर बाजू

राजस्थान - सिनिअर खेळाडू अपयशी ठरत असल्यामुळे कार्तिक त्यागी व रियान पराग यांच्यावर अतिरिक्त दडपण. बेन स्टोक्सही कामगिरी करण्यात अपयशी. 

हैदराबाद - सुपर ओव्हरमध्ये पराभव पत्करावा लागल्यामुळे मनोधैर्य ढासळले. दुखापतीमुळे भुवनेश्वर कुमार व अष्टपैलू मिशेल मार्श बाहेर झाल्यामुळे संघाचा समतोल ढासळला.

आमने-सामनेसामने - ११विजय - हैदराबाद - ६राजस्थान - ५

टॅग्स :IPL 2020राजस्थान रॉयल्ससनरायझर्स हैदराबाद