SRH vs RCB Latest News : संदीप शर्मानं घेतली विराट कोहलीची विकेट; झहीर खानच्या विक्रमाशी बरोबरी अन्...

SRHला प्ले ऑफच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी उर्वरित दोन्ही सामने जिंकणे गरजेचं आहे.

By स्वदेश घाणेकर | Published: October 31, 2020 08:08 PM2020-10-31T20:08:43+5:302020-10-31T20:09:12+5:30

whatsapp join usJoin us
SRH vs RCB Latest News : Sandeep Sharma has dismissed Virat Kohli seven times in the IPL which is joint-most in IPL history | SRH vs RCB Latest News : संदीप शर्मानं घेतली विराट कोहलीची विकेट; झहीर खानच्या विक्रमाशी बरोबरी अन्...

SRH vs RCB Latest News : संदीप शर्मानं घेतली विराट कोहलीची विकेट; झहीर खानच्या विक्रमाशी बरोबरी अन्...

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

सनरायझर्स हैदराबाद ( Sunrisers Hyderabad) संघाला शनिवारी आणखी एक मोठा धक्का बसला. मिचेल मार्श, भुवनेश्वर कुमार यांच्यानंतर SRHचा अष्टपैलू खेळाडू विजय शंकरनं दुखापतीमुळे Indian Premier League ( IPL 2020) मधून माघार घेतली आहे. SRHला प्ले ऑफच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी उर्वरित दोन्ही सामने जिंकणे गरजेचं आहे. त्याच निर्धारानं मैदानावर उतरलेल्या SRHनं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( Royal Challengers Bangalore) संघाला सुरुवातीला धक्के दिले. संदीप शर्मानं ( Sandeep Sharma) RCB कर्णधार विराट कोहलीची विकेट घेत, IPLमध्ये एका विक्रमाला गवसणी घातली. 

- सनरायझर्स हैदराबादनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा घेतला निर्णय

- विजय शंकर दुखापतीमुळे बाहेर, पण वृद्धीमान सहा आजच्या सामन्यासाठी फिट

- RCBच्या संघात दोन बदल; नवदीप सैनी, इसुरू उडाना IN, तर शिवम दुबे, डेल स्टेन OUT

- रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू - देवदत्त पडिक्कल, जोश फिलिफ, विराट कोहली, एबी डिव्हिलियर्स, गुरकिरत सिंग मान, वॉशिंग्टन सुंदर, ख्रिस मॉरिस, इसुरू उडाना, नवदीप सैनी, मोहम्मद सिराज, युझवेंद्र चहल

- सनरायझर्स हैदराबाद - डेव्हिड वॉर्नर, वृद्धीमान सहा, मनीष पांडे, केन विलियम्सन, अब्दुल समद, जेसन होल्डर, अभिषेक शर्मा, राशिद खान, शाहबाज नदीम, संदीप शर्मा, टी नटराजन

संदीप शर्मानं तिसऱ्या षटकात देवदत्त पडीक्कलचा त्रिफळा उडवला. त्यानंतर पाचव्या षटकात विराट कोहलीला त्यानं केन विलियम्सनकरवी झेलबाद करून माघारी पाठवले. RCBचे दोन फलंदाज २८ धावांवर माघारी परतले होते. संदीपनं या विकेटसह आयपीएलमध्ये विराटला सातव्यांदा बाद केले. आयपीएलमध्ये विराटला यापूर्वी आशिष नेहरानं ( ६) सर्वाधिक वेळा बाद केले होते. संदीपनं तो विक्रम मोडला. याचसह त्यानं IPLमध्ये एकाच फलंदाजाला सर्वाधिक ७ वेळा बाद करण्याच्या झहीर खानच्या विक्रमाशी बरोबरी केली. झहीरनं ७ वेळा महेंद्रसिंग धोनीला बाद केले आहे.




 

Web Title: SRH vs RCB Latest News : Sandeep Sharma has dismissed Virat Kohli seven times in the IPL which is joint-most in IPL history

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.